११२ चा कॉल ठरला जीवनदायी; मध्यरात्री गंभीर महिलेच्या मदतीला मंडणगड पोलिसांची धाव
(मंडणगड /रत्नागिरी प्रतिनिधी) मध्यरात्री अचानक प्रकृती गंभीर झालेल्या नेपाळी महिलेच्या मदतीसाठी मंडणगड पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने तिच्यावर तातडीने उपचार करणे शक्य झाले. रिक्षा आणि रुग्णवाहिका उपलब्ध होत नसताना नागरिकाने केलेला…
ज्येष्ठ नागरिकांना सायबर ठगांचा वाढता धोका; ‘SBI YONO’च्या नावाने ८६ वर्षीय वृद्धाला लाखोंचा गंडा
(चिपळूण /रत्नागिरी) ‘एसबीआय योनो ॲपच्या कार्यालयातून बोलत असल्याचे’ भासवत सायबर भामट्याने चिपळूणमधील ८६ वर्षीय निवृत्त वृद्धाची तब्बल ५ लाख २६ हजार २७९ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला…
पवारसाखरीचे सुपुत्र प्रमोद पवार यांना ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’; राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय सन्मान
( गुहागर / वार्ताहर ) गुहागर तालुक्यातील पवारसाखरी गावचे सुपुत्र, ज्येष्ठ नाट्य व सिनेअभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते प्रमोद ज्ञानदेवराव पवार यांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय कलाप्रवासाला राष्ट्रीय स्तरावर मानाची पावती मिळाली…
शालेय वेळेत शाळेबाहेर जाणाऱ्या शिक्षकांवरील कारवाईच्या निर्णयाचे स्वागत; मात्र शाळाबाह्य कामांवरही पुनर्विचाराची मागणी
(रत्नागिरी / वार्ताहर) रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीने शालेय वेळेत जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा अन्य ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असला, तरी शिक्षकांना वारंवार शाळेबाहेर…
मंजुरीविना पत्रव्यवहार; चिपळूणचे कार्यकारी अभियंता निलंबित
(चिपळूण / रत्नागिरी) गडनदी आणि जामदा प्रकल्पाशी संबंधित प्रलंबित देयकाच्या अदायगीप्रकरणी आवश्यक मंजुरी नसतानाही कंत्राटदाराशी पत्रव्यवहार केल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र शासनाने पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग, चिपळूणचे कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव…
‘आमिर’मधील १८०० टन गॅसचा पेच; पहिल्या टप्प्यात १५० टन उतरविण्याची तयारी
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासन सतर्क
तीन आमरण उपोषणे, ६९ वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच!
आदेशाची अंमलबजावणी रखडली; निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
केंद्रशाळा जवळेथर येथे विद्यार्थ्यांचे रानभाज्यांचे प्रदर्शन; स्थानिक जैवविविधता आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीची ओळख
(राजापूर / तुषार पाचलकर) तालुक्यातील जवळेथर येथील केंद्रशाळेत गुरुवार, दि. १३ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांनी विविध रानभाज्यांचे आकर्षक प्रदर्शन भरविले होते. स्थानिक परिसरात सहज उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी, त्यांच्या…
कोकणातील तरुणांसाठी मोठी संधी! सिंधुदुर्गात जहाज बांधणी प्रकल्पाची मुहूर्तमेढ; ‘रिव्हर्स मायग्रेशन’ला मिळणार बळ
(सिंधुदुर्ग / प्रतिनिधी) कोकणातील तरुणांचे रोजगारासाठी मुंबई, पुण्यासह मोठ्या शहरांकडे होणारे स्थलांतर थांबवून त्यांना स्थानिक पातळीवरच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मांडण्यात आलेल्या ‘रिव्हर्स मायग्रेशन’ संकल्पनेला आता प्रत्यक्ष आकार…
रत्नदुर्ग किल्ल्यावर दीपोत्सव उत्साहात; दीपप्रज्वलनातून गडकिल्ले संवर्धनाचा संदेश
(रत्नागिरी / वार्ताहर) दीप अमावस्येचे औचित्य साधून गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य, रत्नागिरी विभागाच्या वतीने ऐतिहासिक किल्ले रत्नदुर्ग येथे दीपोत्सव २०२६ उत्साहपूर्ण आणि शिवमय वातावरणात साजरा करण्यात आला. महादरवाजा आणि…

