(राजापूर / तुषार पाचलकर)
तालुक्यातील पाचल येथील पी ए म श्री जिल्हा परिषद गणेश विद्यामंदिर आदर्श शाळा पाचल क्रमांक ५च्या नूतन इमारतीचे भूमिपूजन आज (गुरुवार, १२ नोव्हेंबर २०२६) रोजी आमदार किरण सामंत यांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात करण्यात आले. या नवीन इमारतीसाठी आमदार किरण सामंत यांच्या प्रयत्नांतून ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्री महागणपती उत्सव मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आण्णा पाथरे यांनी नूतन शाळा इमारतीसाठी ५० लाख रुपयांचा निधी मिळवून दिल्याबद्दल आमदार किरण सामंत यांचे शाळा व्यवस्थापन समिती आणि श्री महागणपती उत्सव मंडळाच्या वतीने आभार मानले.
शाळेच्या इमारतीसाठी जमीन उपलब्ध करून देणाऱ्या पाथरे कुटुंबीयांचे प्रतिनिधी प्रसाद पाथरे आणि धनंजय पाथरे यांचा आमदार किरण सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या भूमिपूजन सोहळ्याला उपजिल्हाप्रमुख आशफाक हाजू, तालुकाप्रमुख दीपक नागले, राजापूर पंचायत समिती सभापती नंदिनी कदम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुषार लिंगायत, श्री महागणपती उत्सव मंडळाचे अध्यक्ष शिरीष सक्रे, जिल्हा परिषद सदस्या सिद्धाली मोरे, पंचायत समिती सदस्या अपेक्षा मासये आणि समीक्षा वाफेलकर, पाचलचे सरपंच बाबालाल फराससर, उपसरपंच आत्माराम सुतार, विभागप्रमुख शैलेश साळवी, अमर जाधव, युवा सेना तालुकाप्रमुख सुनील गुरव, पंचायत समिती सदस्य अविनाश पराडकर आणि सामाजिक कार्यकर्ते आप्पा साळवी उपस्थित होते.
तसेच लघु पाटबंधारे विभागाचे अमोल बनसोड, पाचल मंडळ अधिकारी संजय पवार, शासकीय ठेकेदार जगदीश उर्फ जगदीश पाथरे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि शिक्षणप्रेमी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


