(राजापूर / वार्ताहर)
कोणतेही कारण नसताना अश्लील शिवीगाळ करून भावजयीला मारहाण तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना राजापूर तालुक्यातील होळी भंडारवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी नाटे सागरी पोलीस ठाण्यात संशयित दिराविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
साक्षी शशांक शिरवडकर (वय ४०, रा. होळी भंडारवाडी, ता. राजापूर) यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. समीर विजय शिरवडकर (रा. होळी भंडारवाडी) असे संशयित दिराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (११ नोव्हेंबर) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास साक्षी शिरवडकर या घरी असताना समीर शिरवडकर याने कोणतेही कारण नसताना त्यांना आई-बहिणीवरून अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर हाताच्या थापटाने मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेनंतर गुरुवारी (१२ नोव्हेंबर) साक्षी शिरवडकर यांनी नाटे सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित समीर शिरवडकर याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३५२, ३५१(३) आणि ११५(२) अन्वये अदखलपात्र (N.C.R.) गुन्ह्याची नोंद केली आहे.


