दागिने गहाण ठेवून ४.३४ लाखांचा ‘खेळ’; अखेर नाटे पोलिस ठाण्यात त्या दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल
(राजापूर /प्रतिनिधी) सोन्याचे दागिने गहाण ठेवून त्यातून मिळालेली रक्कम तसेच रोख पैसे परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी आंबेरकोणी साखर येथील दाम्पत्याविरोधात नाटे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या…
एसआयआरमध्ये मतदार याद्यांचा गोंधळ; एकाच कुटुंबातील नावे वेगवेगळ्या प्रभागांत; काय करावं?
(रत्नागिरी /प्रतिनिधी) भारत निवडणूक आयोगाच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत (एसआयआर) मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम जिल्ह्यात सुरू होते. १७ ऑगस्टपर्यंत चाललेल्या या प्रक्रियेत बूथस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन मतदारांकडून गणनापत्रे भरून…
आंबा घाटातून एसटी वाहतूक पुन्हा सुरू; दरडग्रस्त ओझरे खिंडीत अत्यंत धीम्या गतीने वाहतूक करण्याच्या सूचना
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील आंबा घाटातील ओझरे खिंड येथे रस्त्याला भेगा पडून रस्ता खचल्याने बंद करण्यात आलेली एसटी वाहतूक अखेर पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मात्र,…
रत्नागिरीत ‘हिप्नोटिझम स्टेज शो’चे आयोजन; मनोरंजनासोबत वैज्ञानिक दृष्टिकोनाची अनुभूती !
(रत्नागिरी / वार्ताहर) रत्नागिरी हिप्नोथेरपी अँड माइंड प्रोग्रामिंग सेंटर, रत्नागिरी यांच्या वतीने ‘हिप्नोटिझम स्टेज शो’चे आयोजन करण्यात येत असून, मनोरंजनासोबत संमोहनशास्त्राची ओळख करून देणारा हा विशेष कार्यक्रम ठरणार आहे. संमोहन…
शिवने येथील ज्येष्ठ दुग्ध व्यावसायिक श्रीकृष्ण हळबे यांचे निधन
(संगमेश्वर / प्रतिनिधी) संगमेश्वर तालुक्यातील शिवने येथील ज्येष्ठ दुग्ध व्यावसायिक श्रीकृष्ण जयराम हळबे (९२) यांचे मंगळवारी दुपारी ३ वाजता वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाने शिवने गावावर शोककळा पसरली.…
नोकरीच्या शर्यतीत उत्तर प्रदेश अव्वल! महाराष्ट्राचा नंबर कितवा? रोजगारक्षमतेची आकडेवारी समोर
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) शिक्षण आणि रोजगाराचा प्रश्न देशभरात चर्चेचा विषय बनला असताना, तरुणांच्या रोजगारक्षमतेबाबत महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे. ‘इंडिया स्किल रिपोर्ट २०२६’नुसार, युवकांच्या रोजगारक्षमतेच्या बाबतीत उत्तर प्रदेश देशात…
PM CARES Fund ची आकडेवारी समोर; देणग्या कमी, तरी कमाई वाढली… कुठून आला पैसा?
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) केंद्र सरकारने पीएम केअर्स फंडाच्या २०२४-२५ या आर्थिक वर्षातील आर्थिक स्थितीची माहिती सार्वजनिक केली आहे. त्यानुसार, या निधीत एकूण ८,४५२ कोटी रुपयांची रक्कम शिल्लक आहे. विशेष…
महाराष्ट्राचा क्रीडा क्षेत्रात डंका! विदित गुजराती, दिव्या देशमुख यांना अर्जुन पुरस्कार; नेहा चव्हाण यांना द्रोणाचार्य
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाने जाहीर केलेल्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५ मध्ये महाराष्ट्राने दमदार कामगिरी नोंदवली आहे. बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर विदित संतोष गुजराती आणि ग्रँडमास्टर दिव्या…
राज्यात नवीन पोलीस ठाण्यांसाठी नवे निकष; ‘अ’, ‘ब’, ‘क’ वर्गवारीनुसार मनुष्यबळ ठरणार
(मुंबई / वृत्तसंस्था) वाढती लोकसंख्या, शहरीकरण, औद्योगिक आणि तांत्रिक विकास, पर्यटन, वाहतूक तसेच गुन्हेगारीच्या बदलत्या स्वरूपामुळे राज्यातील पोलीस यंत्रणेवरील ताण वाढत आहे. त्यातच सायबर गुन्ह्यांमध्येही सातत्याने वाढ होत असल्याने नवीन…
चाकण MIDC मधील १,००० कोटींची गुंतवणूक धोक्यात, वाहतूक कोंडीवर सरकारचा १०,५०२ कोटींचा मास्टर प्लॅन
(पुणे / पिंपरी चिंचवड) चाकण एमआयडीसीतील खड्डे, प्रचंड वाहतूक कोंडी, अपघात आणि पायाभूत सुविधांच्या समस्यांमुळे तब्बल २० कंपन्यांनी स्थलांतराचा निर्णय जाहीर केल्याने पुण्यासह राज्यात खळबळ उडाली आहे. या कंपन्यांनी स्थलांतर…

