गणपतीपुळे समुद्रकिनारा ६० दिवसांनंतर पर्यटकांसाठी खुला; सुरक्षेच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन
(गणपतीपुळे / वैभव पवार) पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आलेला गणपतीपुळे समुद्रकिनारा तब्बल ६० दिवसांनंतर पुन्हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. सोमवार २४ ऑगस्ट रोजी दुपारपासून पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास…
रत्नागिरीतील अतिक्रमण हटाव मोहिमेत दुजाभाव नको; कारवाई करताना न्यायाचा समान तराजू हवा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरातील अतिक्रमणांविरोधात नगर परिषदेने सुरू केलेल्या कारवाईचे स्वागत होत असतानाच, या मोहिमेच्या अंमलबजावणीबाबत आता दुजाभावाचे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. रस्त्यालगत टपऱ्या उभारून व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांवर…
पाचलमध्ये ५१ हजारांची दहीहंडी; रस्सीखेच स्पर्धा ठरणार मुख्य आकर्षण
(राजापूर/ तुषार पाचलकर) गतवर्षीच्या उत्साहपूर्ण आयोजनानंतर यंदाही पाचल पंचक्रोशी मित्र मंडळाच्या वतीने दहीहंडी २०२६ या भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाचे मुख्य आकर्षण ५१ हजार रुपयांची दहीहंडी असून,…
वैश्यवाणी समाजाच्या OBC प्रश्नाला मिळणार न्याय; २००८ च्या शासन परिपत्रकानुसार कार्यवाहीचे आदेश
(मुंबई / वृत्तसंस्था) वैश्यवाणी समाजाच्या OBC जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रक्रियेत येणाऱ्या विविध अडचणी दूर करण्यासाठी आमदार प्रमोद जठार आणि आमदार किरण सामंत यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला महत्त्वपूर्ण यश…
सावधान! फोनवरचा ‘एक कॉल’ अन् आयुष्यभराची पुंजी गायब
(रत्नागिरी / प्रतिनिधी) मोबाईलच्या एका कॉलवर विश्वास ठेवणे रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना चांगलेच महागात पडत आहे. सायबर गुन्हेगारांनी विविध क्लृप्त्या वापरत नागरिकांना गंडा घालण्याचे सत्र सुरूच ठेवले असून, ऑगस्ट महिन्यातील अवघ्या…
‘त्या’ भरकटलेल्या नौकेचा पंचनामा; खरे नुकसान नौका बाहेर काढल्यानंतरच स्पष्ट होणार
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) शहरालगतच्या कुर्ली समुद्रकिनारी इंजिन बंद पडल्याने वाऱ्याच्या प्रवाहासोबत भरकटत खडकावर आदळलेल्या ‘अल रिझवान’ या मासेमारी नौकेचा प्राथमिक पंचनामा करण्यात आला आहे. सहायक मत्स्य व्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी चिन्मय…
रस्त्यावर ट्रॅव्हल्स उभ्या करून वाहतुकीला अडथळा; दोन चालकांवर गुन्हा
(रत्नागिरी /प्रतिनिधी) शहरातील रस्त्यांवर ट्रॅव्हल्स उभ्या करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या दोन चालकांवर रत्नागिरी शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. तेलीआळी नाका ते आठवडा बाजार या मार्गावर रविवारी रात्री ही कारवाई…
हर्णेच्या समुद्रकिनारी अनोळखी व्यक्तीचा सापडला मृतदेह; घटनेने खळबळ
(दापोली / वार्ताहर) तालुक्यातील हर्णे वाकडीबेंड येथे समुद्रकिनाऱ्याजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. आज (मंगळवारी, २५ ऑगस्ट) सकाळच्या सुमारास किनाऱ्यालगत राहणाऱ्या ग्रामस्थांच्या निदर्शनास हा प्रकार आला. समुद्रकिनाऱ्याजवळ…
लग्नपत्रिका वाटल्या, सुट्टीही घेतली… पण अचानक निर्णय बदलला! दोन महिला पोलिसांच्या ‘पुनर्निर्णया’ची चर्चा
(पिंपरी-चिंचवड / वृत्तसंस्था) पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील दोन महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी 30 ऑगस्ट रोजी आळंदी येथे वैदिक पद्धतीने विवाह करण्याची तयारी केली होती. विवाहासाठी दोघींनी पोलीस प्रशासनाकडे रजेचे अर्जही सादर केले…
महायुतीतील अंतर्गत वादावर मुख्यमंत्र्यांचा दणका; DPDC निधी वाटपाचा फॉर्म्युला ठरला, 15 दिवसांत महामंडळ वाटप
(मुंबई / वृत्तसंस्था) सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत मतभेद आणि स्थानिक पातळीवरील धुसफूस मिटवण्यासाठी झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. रखडलेली शासकीय महामंडळे, जिल्हा नियोजन समितीच्या (DPDC)…

