संगमेश्वरात चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री तीन दुकाने फोडली, हजारोंचा माल लंपास; श्वानपथकालाही अपयश
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर शहरात एकाच रात्री तीन दुकाने फोडून अज्ञात चोरट्याने हजारो रुपयांचा माल लंपास केल्याची घटना घडली आहे. संगमेश्वर एसटी बसस्थानकाजवळ, संगमेश्वर–देवरुख मार्गावरील साईराज कोल्ड्रिंक्स, दत्त कृपा…
आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना सप्ताह उत्साहात साजरा
( देवरुख / प्रतिनिधी ) देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना(एन. एस. एस.) स्थापना दिन आणि ‘एन. एस. एस. स्थापना सप्ताह’ विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.…
रत्नागिरीत “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्ह्यात “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” या विशेष आरोग्य अभियानाला महिलांकडून आणि नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा…
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी विक्रांत जाधव यांची नियुक्ती
(चिपळूण) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) ने रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात मोठा फेरबदल केला आहे. पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि युवा…
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समितीतर्फे निषेध; हल्लेखोरावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
(कळझोंडी / किशोर पवार) भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समितीचे वतीने जाहीर निषेध केला असून या हल्लेखोर राकेश किशोर तिवारी याच्यावर देशद्रोही गुन्हा…
महाराष्ट्रात ‘अमृत’तर्फे दीपावलीमध्ये होणार विश्वविक्रमी दुर्गोत्सव! छत्रपती शिवरायांना अनोखी मानवंदना – विजय जोशी
(रत्नागिरी) महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दुर्ग, गड यांचा सार्थ अभिमान अवघ्या भारतदेशाला आहे. दर दिवाळी सणामध्ये बच्चेकंपनी मातीचे किल्ले बनवून छत्रपतींच्या कार्याचे स्मरण आणि अभिवादन करत असते.…
गुहागर : नरवण बाजारपेठेतच BSNL नेटवर्कचा अभाव; डिजिटल व्यवहार ठप्प
(नरवण / वार्ताहर) गुहागर तालुक्यातील नरवण धरणवाडी भागात २०१८ साली उभारण्यात आलेला BSNL मोबाईल टॉवर नेटवर्क अभावी अनेक दिवस बंद राहत आल्याने परिसरातील नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.…
सेवामार्गातर्फे बीडमध्ये पाचशे पूरग्रस्तांना गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे यांच्या उपस्थितीत मदत वाटप
(नाशिक / प्रतिनिधी) अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गातर्फे गुरुपीठाचे उपव्यवस्थापक गुरुपुत्र श्री. नितीनभाऊ मोरे यांच्या उपस्थितीत बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यामधील पाचशे पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून त्यांना धीर आणि…
थिबा पॅलेसजवळ दुचाकी इलेक्ट्रीक पोलवर आदळली; एक गंभीर, एक किरकोळ जखमी
(रत्नागिरी) शहरातील थिबा पॅलेसजवळ अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळील रस्त्यावर झालेल्या अपघातात दोन तरुण जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. ही घटना मंगळवारी (दि. ७ ऑक्टोबर) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. जखमींची…
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध; बावीस खेडी संघाचे जिल्हाधिकारी आणि जयगड पोलीस ठाण्याला निवेदन!
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील बावीस खेडी बौद्धजन संघ दीक्षाभूमी वाटद खंडाळा या संघटनेच्या वतीने भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ रत्नागिरीचे जिल्हाधिकारी आणि जयगड पोलीस…

