(जाकादेवी/ वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील बळीराम परकर विद्यालय, मालगुंड या दहावी परीक्षा केंद्रावर ११८विद्यार्थी परीक्षेला बसले असून या केंद्रावर मालगुंडसह नेवरे शाळेचे विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. या परीक्षा केंद्रावर केंद्र संचालक म्हणून बळीराम परकर विद्यालयाचे मुख्याध्यापक बिपीन परकर तर केंद्राचे उपसंचालक म्हणून नेवरे शाळेचे क्रीडा शिक्षक मिलिंद महाकाळ काम पाहत आहेत. परीक्षा अतिशय शांततेत व सुरळीत सुरू आहे.
परीक्षा यशस्वीतीसाठी वाटद -खंडाळा कस्टडी ६७ येथील कस्टोडीयन म्हणून रत्नागिरी शिक्षण विभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी भाग्यश्री हिरवे, सहाय्यक कस्टोडीयन म्हणून खंडाळा येथील शिक्षक सुनिल कांबळे, रामदास पालशेतकर तसेच परिसरातील शाळांतील मुख्याध्यापक पर्यवेक्षक, रनर मिलिंद सुर्वे यासह खंडाळा कस्टडी व मालगुंड केंद्रावरील सर्व स्टाफ मेहनत घेत आहे.

