(जाकादेवी/ वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे या इयत्ता दहावीच्या परीक्षा केंद्रावर एकूण ५६ विद्यार्थी सहभागी झाले असून परीक्षा अतिशय शांततेत व सुरळीत सुरू आहे
या परीक्षा केंद्रावर दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे,इरा इंग्लिश मिडियम स्कुल, न्यू इंग्लिश स्कुल सैतवडे, न्यू इंग्लिश स्कूल पडवे शाळांचा सहभाग आहे. या केंद्रावर केंद्रसंचालक म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक विलासराव कोळेकर तर केंद्राचे उपसंचालक म्हणून इमरान इब्राहिम अंतुले हे काम पाहत आहेत.
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात लहान केंद्र म्हणून या केंद्राकडे पाहिले जाते. दहावी परीक्षेला पडवेतून होडीने मुले या केंद्रावर येतात. निसर्गरम्य व उंचावर वसलेले ही एक जुने व प्रशस्त केंद्र ओळखले जाते.

