निवळीतील पुलाचे काम वेगात; मात्र धूळ, खड्डे आणि वाहतूक कोंडीवर महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष?
(रत्नागिरी / प्रतिनिधी) तालुक्यातील निवळी परिसरात राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचे काम वेगाने सुरू असले तरी या कामामुळे निर्माण झालेल्या मूलभूत अडचणींकडे संबंधित महामार्ग प्राधिकरण विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याची तीव्र भावना नागरिकांमधून…
साखरपा गावात पारंपरिक उत्साहात जुगाई देवी पालखीचा खुणा काढण्याचा कार्यक्रम संपन्न
(साखरपा / भरत माने) साखरपा गावात गुरववाडी सहान येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही पालखीचा खुणा काढण्याचा पारंपरिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात संपन्न झाला. ग्रामस्थांच्या सहभागामुळे संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले…
निवळी बौद्धवाडीत पुन्हा रस्ता रोखण्याचा प्रकार; चिरे टाकून मार्ग बंद, ग्रामस्थांचा संतप्त सवाल
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथील बौद्धवाडीकडे जाणारा सार्वजनिक रस्ता अज्ञात व्यक्तीकडून पुन्हा एकदा चिरे टाकून अडविण्यात आल्याचा प्रकार सोमवारी (१६ मार्च) दुपारच्या सुमारास उघडकीस आला. भरदिवसा घडलेल्या या…
मैत्री पार्कऐवजी घाटकोपर सर्वोदयवरून कोकणात एस.टी. सोडाव्यात – शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाची मागणी
( मुंबई / शांताराम गुडेकर ) शिवसेना नेते, खासदार व ग्राहक संरक्षण कक्षचे अध्यक्ष श्री.अनिलभाऊ देसाई यांच्या आदेशानुसार तसेच ग्राहक संरक्षण कक्षचे सचिव श्री. निखिलजी सावंत व श्री. अशोकजी शेंडे…
गद्दारी शब्दावरून विधान परिषदेत कलगीतुरा; अनिल परब आणि उदय सामंत भिडले
(मुंबई) महानगरपालिकेच्या थकीत निधीच्या विषयावरून सोमवारी विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगला. शिवसेना (ठाकरे) आमदार अनिल परब यांनी निधी वाटपावरून सरकारवर 'गद्दारी'ची टीका केली, तर त्याला उद्योगमंत्री उदय सामंत…
महाड सत्याग्रह शताब्दी वर्षाची सुरुवात; लाडवली येथे मानवी हक्क राष्ट्रीय परिषद
(चिपळूण / प्रतिनिधी) महाड चवदार तळे सत्याग्रह आणि मनुस्मृती दहन आंदोलन यांच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त १९ व २० मार्च रोजी महाड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर…
गुरेढोरांची घटती संख्या; ग्रामीण भागातून आवसा होत चालला लुप्त
(रत्नागिरी / प्रतिनिधी) ग्रामीण भागातील पारंपरिक जीवनपद्धतीत शेती आणि गुरेढोरे हे परस्परपूरक घटक मानले जात असत. शेतकरी जीवनाचा अविभाज्य भाग असलेली गुरांची देखभाल, गोठ्यांची रचना आणि ऋतूनुसार बदलणारी व्यवस्था यांतून…
बायपाससह मोठ्या शस्त्रक्रिया आता पूर्णपणे मोफत; विधानसभेत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची घोषणा
(मुंबई) महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेअंतर्गत बायपाससह विविध मोठ्या शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना आता स्वतःच्या खिशातून एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही, अशी महत्त्वाची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर…
रत्नागिरीत उष्णतेचा चढता पारा; प्राथमिक आरोग्य केंद्रांत उष्माघात कक्ष सज्ज
(रत्नागिरी /प्रतिनिधी) मार्चच्या प्रारंभापासूनच जिल्ह्यात उन्हाचा तडाखा तीव्र होत असून, वाढत्या तापमानामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. शासनाकडून प्राप्त झालेल्या सूचनांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष सज्ज…
निरबाडेतील जमिनीच्या वादाला हिंसक वळण; प्रौढास मारहाण, तिघांविरोधात गुन्हा
(चिपळूण / प्रतिनिधी) तालुक्यातील निरबाडे पश्चिमवाडी येथे जमिनीच्या वादातून एका प्रौढ व्यक्तीस रस्त्यात अडवून मारहाण केल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी दुपारच्या…

