खेडमध्ये मध्यरात्री घरासमोर हल्ला; कौटुंबिक वादातून ज्येष्ठ व्यक्तीवर सुरीने वार
(रत्नागिरी /प्रतिनिधी) खेड तालुक्यातील बहीरवली भोईवाडीत कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री झालेल्या हल्ल्यात ६३ वर्षीय व्यक्ती जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सचिन सत्यवान जुवळे याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३…
करंजाणीतील वृद्ध महिलेचे झोपेत निधन; परिसरात हळहळ
(रत्नागिरी /प्रतिनिधी) दापोली तालुक्यातील करंजाणी-दर्भाचीवाडी येथे ८१ वर्षीय वृद्ध महिलेचे झोपेतच निधन झाल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. सुलोचना श्रीपत साळवी या आपल्या राहत्या घरात निश्चल अवस्थेत आढळून आल्याने परिसरात…
पालीतील श्री लक्ष्मीपल्लीनाथ चैत्रोत्सवाला उद्यापासून प्रारंभ; सहा दिवस धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
(पाली / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील पाली-पाथरटचे ग्रामदैवत व कोकणातील प्रसिध्द पालीच्या श्री लक्ष्मीपल्लीनाथ देवस्थानचा वार्षिक चैत्रोत्सव सोहळा दि. २९ मार्च ते ३ एप्रिलपर्यंत मुख्य मंदिरामध्ये पार पडणार आहे.या सोहळ्यासाठी पालीतील…
चिपळूणमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; दोन फ्लॅट व तीन दुकाने फोडली, सीसीटीव्हीत संशयित कैद
(चिपळूण) चिपळूण शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून पागमळा परिसरातील दोन बंद फ्लॅट आणि मार्कंडी भागातील तीन दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण…
राजापूर : जवळेथरमध्ये गोवा बनावटीच्या दारूवर पोलिसांचा छापा; एकावर गुन्हा दाखल
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील जवळेथर (गोसावीवाडी) येथे अवैध दारूविक्रीविरोधात पोलिसांनी कारवाई करत गोवा बनावटीच्या दारूचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी जयकुमार उर्फ तातू सखाराम मोरे (वय ६५)…
मानसकोंड येथे ‘स्नेहबंध माहेरवाशीन’चा पहिला कुटुंब स्नेहमेळावा उत्साहात संपन्न
(संगमेश्वर / मकरंद सुर्वे) संगमेश्वर तालुक्यातील मानसकोंड येथे स्नेहबंध माहेरवाशीन मध्यविभाग, फेपडेवाडी यांच्या वतीने प्रथमच आयोजित करण्यात आलेला कुटुंब स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात माहेरवाशीन, सासुरवाशीन, भाऊ तसेच ज्येष्ठ…
निवे बुद्रुकमध्ये कपाटातील चावीनेच ७० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास
( देवरुख ) संगमेश्वर तालुक्यातील निवे बुद्रुक (शिंदेवाडी) येथे घरातील कपाटातून ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, चोरट्याने कोणतेही कुलूप न तोडता…
१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात रत्नागिरी पोलीस दलाचा राज्यात ५वा क्रमांक
(राजापूर / तुषार पाचलकर) महाराष्ट्र शासनाच्या “१५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम” अंतर्गत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात ५वा क्रमांक मिळवला आहे. या यशाबद्दल रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयाचा…
‘मित्र’ नाट्यप्रयोगाने लक्ष्मी नारायण मंदिरातील रामनवमी उत्सवाची रंगतदार सांगता
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) चिपळूणातील श्री लक्ष्मी नारायण मंदिरात मित्र हा नाट्य प्रयोग झाला. या नाट्य प्रयोगाने या मंदिरातील रामनवमी उत्सवाची सांगता झाली. श्री लक्ष्मी नारायण देवस्थान नाट्य समाज…
प्रभाग क्रमांक ४ मधील रस्त्यांची दैना; आठ दिवसांत दुरुस्ती न झाल्यास शिवसेनेचा ‘रस्ता रोको’ इशारा
(रत्नागिरी /प्रतिनिधी) शहरातील नगरपरिषद प्रभाग क्रमांक ४ मधील रस्त्यांची बिकट अवस्था आता नागरिकांच्या संयमाची मर्यादा ओलांडणारी ठरत असून, या प्रश्नावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक पवित्र्यात उतरली आहे. प्रभागातील कोकणनगर,…

