कृषी सेवा महासंघाचे ७ सप्टेंबरला धरणे आंदोलन; मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी
(देवळे / प्रकाश चाळके) महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघाच्या वतीने आज, सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. कृषी विभागातील अधिकारी-कर्मचारी तसेच शेतकऱ्यांच्या हिताशी निगडित असलेल्या…
हरितालिका तृतीया आणि गणेश चतुर्थी १४ सप्टेंबरला एकाच दिवशी; पूजनाच्या वेळेबाबत मोहन दाते यांची माहिती
यंदा १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबरदरम्यान १२ दिवसांचा गणेशोत्सव साजरा होणार आहे. यंदाच्या पंचांगानुसार १४ सप्टेंबर रोजी हरितालिका तृतीया आणि श्रीगणेश चतुर्थी एकाच दिवशी आल्या आहेत, अशी माहिती मोहन दाते…
पाचलमध्ये दहीहंडीचा जल्लोष; १ लाख ५५ हजार ५५५ रुपयांची हंडी ठरली आकर्षण
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील पाचल येथे आज दहीहंडी उत्सव मोठ्या आनंदात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. पाचल पंचक्रोशी मित्र मंडळाच्या वतीने ५१ हजार रुपयांची दहीहंडी आणि रस्सीखेच स्पर्धेचे…
हर्दखळे ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय कारभारात बदल; सरपंचाऐवजी विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती
( लांजा / वार्ताहर ) हर्दखळे ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय कारभारात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून, ग्रामपंचायतीच्या प्रशासकपदाची जबाबदारी आता सरपंचाऐवजी विस्तार अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे. शासनाच्या आदेशानुसार संबंधित विस्तार अधिकाऱ्यांची ग्रामपंचायतीच्या…
‘मयूरपंख २०२६’ सांस्कृतिक महोत्सवात मांडकी-पावलण कृषी महाविद्यालयाचे घवघवीत यश
(चिपळूण / वार्ताहर) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या वतीने आयोजित आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सव ‘मयूरपंख २०२६’ मध्ये मांडकी-पावलण येथील गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध कलाप्रकारांत उल्लेखनीय…
पाचलच्या दहीहंडी उत्सवातील रस्सीखेच स्पर्धेत अव्हेंजर्स तळवडे प्रथम; ए वन कृषी सेवा केंद्र द्वितीय
(राजापूर / तुषार पाचलकर) गतवर्षीच्या उत्साहपूर्ण आयोजनानंतर पाचल पंचक्रोशी मित्र मंडळाच्या वतीने यंदाही दहीहंडी २०२६ या भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले. ५१ हजार रुपयांची दहीहंडी हे उत्सवाचे मुख्य आकर्षण असतानाच…
पालकमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानंतर गणपतीपुळे समुद्रकिनारा पुन्हा पर्यटकांसाठी खुला
(गणपतीपुळे / वैभव पवार) जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणपतीपुळे येथील समुद्रकिनारा तब्बल ६० दिवस बंद राहिल्यानंतर सुरू करण्यात आला होता. मात्र, बीच सुरू होऊन अवघे दहा दिवस झाले…
कापडगावच्या अवघड वळणावर ट्रक पलटी; चालक केबिनमध्ये अडकला
(रत्नागिरी / प्रतिनिधी) तालुक्यातील हातखंबा येथून पालीच्या दिशेने जाणाऱ्या लोखंडी प्लेटांची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा कापडगाव येथील अवघड वळणावर भीषण अपघात झाला. उतारावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट दुभाजकाला धडकून…
जिल्हा परिषदेचे ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर; रत्नागिरीतील ९ शिक्षकांचा गौरव
(रत्नागिरी / वार्ताहर) जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत सन २०२६-२७ या वर्षासाठी देण्यात येणारे मानाचे ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत. कोकण विभागाच्या विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी शिक्षकांच्या…
जयगड खाडीवर ७१५ कोटींचा भव्य केबल-स्टेड सागरी पूल; रत्नागिरी-गुहागर प्रवास होणार अधिक जलद
(रत्नागिरी / वार्ताहर) जयगड खाडीवरील गुहागर तालुक्यातील तवसाळ आणि रत्नागिरी परिसराला जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी सागरी पुलाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून तब्बल ७१५ कोटी रुपये…

