वाढदिवसाच्या पार्टीवरून परतताना तिघा जीवलग मित्रांचा मृत्यू; भरधाव कारची ट्रकला धडक
(सोलापूर) सोलापूर शहरात बुधवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला असून, वाढदिवसाच्या पार्टीवरून परतणाऱ्या तिघा जीवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुणे नाका ते मार्केट यार्ड मार्गावरील हैदराबाद रोडवर भरधाव कारने रस्त्याच्या…
कलिंगड नाही तर…! पायधुनीतील डोकाडिया कुटुंबाच्या चौघांच्या मृत्यूमागचे खरे कारण 11 दिवसांनी उघड
(मुंबई) मुंबईतील पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील चौघांच्या गूढ मृत्यू प्रकरणाचा अखेर 11 दिवसांनी उलगडा झाला आहे. सुरुवातीला चिकन बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र…
चारित्र्याच्या संशयातून नवऱ्याला विजेचा शॉक देऊन हत्या; पत्नीला जन्मठेप
(नांदेड) नांदेड जिल्ह्यातील एका खळबळजनक हत्या प्रकरणात भोकर जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी पत्नीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. चारित्र्यावर संशय घेतल्याच्या रागातून पतीला विजेचा शॉक देऊन हत्या केल्याचे न्यायालयात सिद्ध झाल्यानंतर…
देवळे-चाफवली परिसराला अवकाळी पावसाचा तडाखा; आंबा-काजूचे मोठे नुकसान, शेतकरी हवालदिल
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील देवळे-चाफवली परिसराला गुरुवारी सायंकाळी अवकाळी पाऊस, सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटाने जोरदार तडाखा दिला. या वादळी पावसामुळे आंबा आणि काजू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान…
बुरंबीत वीज कोसळून नारळाच्या झाडाला आग; क्षणभराच्या प्रसंगावधानाने महिलेचा थरारक बचाव
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी परिसरात आज (गुरुवारी) सायंकाळी निसर्गाचे रौद्ररूप पाहायला मिळाले. सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि अवकाळी पावसाच्या तडाख्यात भरत दौलत दळवी यांच्या मालकीच्या नारळाच्या झाडावर…
महामार्गावरील खोदकाम ठरले जीवघेणे; ३० फूट खोल दरडीत कोसळून गवा गंभीर जखमी
(शाहूवाडी/ रत्नागिरी प्रतिनिधी) रत्नागिरी–कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण कामादरम्यान करण्यात आलेल्या खोदकामामुळे वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शाहूवाडी तालुक्यातील निळे गावाजवळ सुरू असलेल्या रस्ते कामाच्या ठिकाणी एका गवा रेड्याचा…
दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार; दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार निकाल
( मुंबई ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या, शुक्रवार दि. ८ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात…
अनधिकृत मासेविक्रीवर कारवाईदरम्यान गोंधळ; नगर परिषद कर्मचाऱ्यांना विरोध, महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
(राजापूर / प्रतिनिधी) शहरातील शिवाजी पथ ते बाजारपेठ परिसरात अनधिकृत मासेविक्रीविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या नगर परिषद कर्मचाऱ्यांना एका महिलेकडून तीव्र विरोधाचा सामना करावा लागल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. कारवाईदरम्यान शासकीय…
फुणगूसची कन्या कस्तुरी लोगडे हिची शैक्षणिक क्षेत्रात चमकदार कामगिरी; ‘डॉक्टर होऊन जनसेवा करायची’ चिमुकलीची जिद्द
(फुणगूस / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस गावची सुकन्या कस्तुरी प्रशांत लोगडे हिने कल्याण येथील ‘शैशव प्री-स्कूल’मध्ये सीनियर केजी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. तिच्या…
मानाच्या ताटावरून वाद विकोपाला; ज्येष्ठ नागरिकाला घरात घुसून मारहाण, चौघांविरोधात गुन्हा दाखल
(चिपळूण/ प्रतिनिधी) पारंपरिक धार्मिक कार्यक्रमातील ‘मानाच्या ताटावरून’ सुरू झालेला किरकोळ वाद थेट मारहाणीपर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना चिपळूण तालुक्यातील ओझरवाडी येथे घडली. या प्रकरणात ७३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला घरात घुसून बेदम…

