(सिंधुदुर्ग / प्रतिनिधी)
कुडाळमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक मिलिंद पांडुरंग देसाई यांचे आज सायंकाळी ५.३० वाजता गोवा, बांबोळी येथे निधन झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून त्यांनी कुडाळ तालुका कार्यवाह तसेच जिल्हा प्रचार विभाग प्रमुख या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या. वृत्तपत्र विक्रेत्या स्टॉलच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना अडीअडचणीच्या काळात मदतीचा हात दिला. कोरोना काळातील त्यांचे कार्य उल्लेखनीय होते. गरजू रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासल्यास ते तात्काळ रक्तदाता उपलब्ध करून देत असत.
त्यांच्या निधनाने कुडाळ शहराच्या सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अंत्ययात्रा उद्या सकाळी ९.३० वाजता नाबरवाडी येथील निवासस्थानातून निघेल.


