दापोलीत दोन वृद्ध महिला बेपत्ता; अवघ्या काही तासांच्या अंतराने दोन घटना, अपहरणाचा गुन्हा दाखल
(दापोली / प्रतिनिधी) तालुक्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी ६४ आणि ८५ वर्षीय वृद्ध महिला बेपत्ता झाल्याच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. दोन्ही महिलांना अज्ञात इसमांनी अज्ञात कारणावरून पळवून नेल्याची तक्रार पोलिसांत दाखल…
साखरीनाटेतील मच्छीमारांसाठी डोंगर जेटीची सुविधा; आमदार किरण सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
(देवळे / प्रकाश चाळके) राजापूर तालुक्यातील साखरीनाटे येथील मच्छीमार बांधवांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या डोंगर जेटीचे उद्घाटन लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण (भैय्या) सामंत यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या जेटीमुळे परिसरातील…
एएचएफ ज्युनियर आशिया कप २०२६ : महिला-पुरुष भारतीय संघांचा दुहेरी विजेतेपदाचा ऐतिहासिक पराक्रम
(दिल्ली/ वृत्तसंस्था) भारतीय हॉकीसाठी रविवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. एएचएफ ज्युनियर आशिया कप २०२६ स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष अशा दोन्ही संघांनी विजेतेपद पटकावत भारताचे नाव आशियाई हॉकीत पुन्हा एकदा उंचावले.…
भैय्यासाहेब आंबेडकर स्मृतिदिनानिमित्त आंबडवेत विशेष कार्यक्रम
( रत्नागिरी/प्रतिनिधी ) भारतीय बौद्ध महासभेच्या रत्नागिरी जिल्हा शाखा, मंडणगड तालुका शाखा आणि आंबडवे ग्रामशाखेच्या संयुक्त विद्यमाने सूर्यपुत्र भैय्यासाहेब तथा यशवंत भीमराव आंबेडकर यांचा स्मृतिदिन तसेच अनागरीक धम्मपाल यांची जयंती…
कोकणातही ‘हुल्लंडबाजी’चा ट्रेंड? तलवारीने केक कापत वाढदिवसाचे सेलिब्रेशन; व्हिडीओ व्हायरल होताच तरुणावर गुन्हा दाखल
( रत्नागिरी/ प्रतिनिधी ) वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला हुल्लडबाजीचे स्वरूप देत सार्वजनिक रस्त्यावर चक्क तलवारीने केक कापणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. मिरजोळे-पाटीलवाडी परिसरात तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडीओ…
बावनदीत भरधाव कारची दुचाकीला धडक; २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
(रत्नागिरी /प्रतिनिधी) मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी येथे भरधाव शेवरलेट एन्जॉय कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. धडकेनंतर तरुण रस्त्यालगत असलेल्या दगडावर आदळल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत…
गणपतीपुळे मंदिरात भाद्रपदी गणेशोत्सवानिमित्त सहस्र मोदक समर्पण विधी भक्तिभावात
(गणपतीपुळे / वैभव पवार) प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथील स्वयंभू श्री गणपती मंदिरात शके १९४८ च्या भाद्रपदी गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, रविवार, १३ सप्टेंबर रोजी श्री…
गणेशोत्सवासाठी मुंबईहून गावी आलेल्या ३१ वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
(संगमेश्वर / वार्ताहर) गणेशोत्सवासाठी मुंबईहून गावी आलेल्या ३१ वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सायले कानालवाडीत येथे घडली. सायले कानालवाडी येथे आज (रविवारी, १३ सप्टेंबर) रोजी सकाळी ७.३०…
डिव्हायडरवर आदळून मुंबई-सिंधुदुर्ग प्रवासातील वाहनाचा अपघात; जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश
(राजापूर /प्रतिनिधी) मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच असून, रविवारी सकाळी हातिवलेनजीक टेम्पो ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. मुंबईहून सिंधुदुर्गच्या दिशेने जाणारे टेम्पो ट्रॅव्हल्स महामार्गावरील डिव्हायडरवर आदळल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेत…
गणेशोत्सवासाठी चिपळूणला येताना काळाचा घाला; खेडमध्ये भीषण अपघात
(खेड रत्नागिरी /प्रतिनिधी) गणेशोत्सवाच्या आनंदासाठी चिपळूणच्या दिशेने निघालेल्या तरुण-तरुणीच्या प्रवासावर रविवारी सकाळी काळाने घाला घातला. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेड तालुक्यातील खवटी गावानजीक दुचाकीचा भीषण अपघात झाला. नियंत्रण सुटल्याने दुचाकी महामार्गालगतच्या…

