डी.बी.जे. स्वायत्त महाविद्यालयात जिल्हास्तरीय युवा महोत्सव कार्यशाळा उत्साहात संपन्न
(रत्नागिरी / वार्ताहर) मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभाग आणि डी.बी.जे. स्वायत्त महाविद्यालय, चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने ५९ व्या युवा महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेली एकदिवसीय जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात पार…
कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिटसाठी २५ जुलैपर्यंत अर्ज करा; २५ लाखांपर्यंत अनुदानाची संधी
(रत्नागिरी) सन २०२६-२७ मधील कडधान्य आत्मनिर्भरता अभियान अंतर्गत जिल्ह्यातील कडधान्य पिकांचे मूल्यवर्धन करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाने 'काढणीपश्चात पायाभूत सुविधा प्रक्रिया व पॅकेजिंग युनिट' या घटकासाठी आर्थिक सहाय्याची योजना सुरू…
भोस्ते घाटात रस्त्याला मोठमोठ्या भेगा; ठेकेदाराकडून तात्पुरत्या मलमपट्टीचा प्रयत्न, सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह
(खेड) मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात मुसळधार पावसामुळे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असून, घाटातील रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडल्याचे समोर आले आहे. या भेगा झाकण्यासाठी ठेकेदाराकडून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आल्याचा आरोप स्थानिक…
रत्नागिरी जिल्हा बँकेची डिजिटल बँकिंगमध्ये दमदार झेप; वर्षभरात ग्राहकांकडून १,०१५ कोटींचे डिजिटल व्यवहार
(रत्नागिरी / वार्ताहर) रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात डिजिटल बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्राहकांकडून तब्बल १,०१५ कोटी रुपयांचे डिजिटल व्यवहार नोंदविले आहेत. यामध्ये UPIद्वारे ७९१…
लांज्यातील २६ वर्षीय तरुण मॅकॅनिक बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल
(लांजा) लांजा तालुक्यातील आसगे, बेनी आणि निवदेकरवाडी परिसरातील २६ वर्षीय तरुण मॅकॅनिक गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता झाल्याची नोंद लांजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सचिन नारायण निवदेकर (वय २६) असे…
खाकीतील माणुसकी! धावत्या वाहतुकीत दुर्मिळ भारतीय सरड्याचा जीव वाचवणाऱ्या लांजा पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांचे सर्वत्र कौतुक
(संगमेश्वर / एजाज पटेल) गुन्हेगारांविरुद्ध कठोर भूमिका घेणाऱ्या पोलिसांच्या खाकी वर्दीमागे एक संवेदनशील मनही दडलेले असते, याची प्रचिती लांजा तालुक्यातील एका प्रसंगातून आली. पडवण ते पन्हळे मार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या दुर्मिळ…
सह्याद्रीच्या कुशीतल्या तिवडी गावाचा २० वर्षांचा पाणीप्रश्न अखेर सुटला; वन विभाग व CSRच्या संयुक्त प्रयत्नातून १० लाखांचा निधी
(चिपळूण / रत्नागिरी) चिपळूण तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या तिवडी गावाचा तब्बल २० वर्षांपासून प्रलंबित असलेला पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. वन विभाग आणि नागपूरस्थित खाजगी कंपनीच्या सामाजिक…
रत्नागिरी सायकलिस्ट क्लबची ‘रत्नागिरी ते पंढरपूर सायकलवारी’ उत्साहात रवाना; ३० सायकलपटूंचा सहभाग
(रत्नागिरी / वार्ताहर) रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे सलग तिसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या ‘रत्नागिरी ते पंढरपूर सायकलवारी’ या अनोख्या उपक्रमाला आज (शुक्रवारी) पहाटे ५ वाजता श्री विठ्ठल मंदिर येथून उत्साहपूर्ण वातावरणात…
राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनानिमित्त रत्नागिरीत ‘शोभिवंत माशांसाठी जिवंत खाद्य निर्मिती’ विषयावरील राज्यस्तरीय कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
(रत्नागिरी) राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनानिमित्त डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठांतर्गत सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव, रत्नागिरी, शोभिवंत मत्स्य शेतकरी ट्रस्ट आणि मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शोभिवंत…
साखरपा महाविद्यालयाचा विद्यार्थ्यांसाठी भात लावणीचा अनोखा उपक्रम; प्रत्यक्ष शेतात उतरून घेतला शेतीचा अनुभव
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथील प्रा. आबा सावंत कला व वाणिज्य महाविद्यालयातर्फे ६ जुलै २०२६ रोजी विद्यार्थ्यांसाठी भात लावणी प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना…

