(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील पाचल बाजारपेठ झपाट्याने विकसित होत असताना, येथील हॉटेल व्यावसायिक यासिन प्रभुळकर यांच्या ‘हॉटेल सफा लॉजिंग अँड बोर्डिंग’ची नवी सुविधा ग्राहकांच्या सेवेत दाखल होत आहे. या हॉटेलचे उद्घाटन गुरुवार, २७ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या हस्ते होणार असून, अपूर्वाताई सामंत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या उद्घाटन सोहळ्याला पाचल गावचे सरपंच बाबालाल फरास, उपसरपंच आत्माराम सुतार, पंचायत समिती सदस्या अपेक्षा मासये, ग्रामपंचायत सदस्य संजय पाथरे, माजी सरपंच अशोक सक्रे, माजी उपसरपंच किशोरभाई नारकर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अण्णा पाथरे तसेच माजी उपसरपंच अफजल पाटणकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यासिन प्रभुळकर हे गेल्या अनेक वर्षांपासून पाचल येथे हॉटेल व्यवसाय यशस्वीपणे चालवत आहेत. कोरोनाकाळातील लॉकडाऊनमध्ये त्यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर व्यवसाय सुरू ठेवत ग्राहकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या या सेवाभावी कार्याची दखल घेत ग्रामपंचायत पाचलच्या वतीने त्यांना ‘कोव्हिड योद्धा’ म्हणून सन्मानित करण्यात आले होते.
पाचल परिसरातील वाढती वर्दळ, बाजारपेठेचा विस्तार आणि बाहेरून येणाऱ्या नागरिकांना राहण्यासाठी भेडसावणारी गैरसोय लक्षात घेऊन प्रभुळकर यांनी लॉजिंग आणि बोर्डिंगची सुविधा सुरू केली आहे. या सुविधेमुळे पाचल येथे येणाऱ्या नागरिकांना निवासासोबत भोजनाची सुविधाही उपलब्ध होणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून व्यवसायासोबत ग्राहकांना चांगली सेवा देण्यावर भर देणाऱ्या यासिन प्रभुळकर यांच्या या नव्या उपक्रमाचे परिसरातून स्वागत होत असून, ‘हॉटेल सफा लॉजिंग अँड बोर्डिंग’मुळे पाचलच्या वाढत्या बाजारपेठेत नागरिकांना आणखी एक महत्त्वाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

