खेड : चाकाळे येथील इसमाचा मुरडे गावातील विहिरीत बुडून मृत्यू
(खेड) तालुक्यातील चाकाळे येथील विशाल सुधाकर चव्हाण (वय ४२) यांचा मुरडे गावातील विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. पाण्याचा पंप काढण्यासाठी ते विहिरीत उतरले असता हा अपघात घडल्याचे…
हिंदी सक्तीविरोधात ठाकरे गट शिवसेनेचा एल्गार ! रत्नागिरीत शासन निर्णयाची होळी करत तीव्र निषेध
(रत्नागिरी) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख श्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शालेय शिक्षण विभागाने इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या शासन निर्णयाची (जीआर) होळी रविवारी रत्नागिरी येथे करण्यात…
विश्व संवाद केंद्राच्या देवर्षी नारद पुरस्कारांचे थाटात वितरण
(रत्नागिरी) ऑपरेशन सिंदूर ही तर एका युद्धाची झलक आहे. यातून आपण काय शिकलो आहे, हे महत्त्वाचे आहे. आधुनिक व बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार केला पाहिजे. शस्त्रास्त्रांच्या दृष्टीने आत्मनिर्भर झाले पाहिजे. तसेच…
रत्नागिरीत भगवती किल्ल्याजवळ तरुणी समुद्रात कोसळून बेपत्ता; सेल्फी की आत्महत्येचा प्रयत्न?
( रत्नागिरी ) शहरातील प्रसिद्ध भगवती किल्ल्याजवळील पाणभुयार स्पॉटजवळ रविवारी दुपारी एक अज्ञात तरुणी खवळलेल्या समुद्रात कोसळून बेपत्ता झाली. ही घटना सेल्फी घेताना अपघाताने घडली की आत्महत्येचा प्रयत्न होता, याबाबत…
महिलांच्या गाण्यांनी निनादली शेतशिवारं; संगमेश्वरात भात लावणीला सुरुवात
( संगमेश्वर /प्रतिनिधी ) तालुक्यात भातलावणीच्या कामांना उत्साहपूर्ण सुरुवात झाली असून, यावर्षी वेळेवर आणि समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण आहे. गेल्या काही वर्षांतील अनिश्चित हवामान आणि पावसाच्या विलंबामुळे चिंतेत…
‘मन की बात’ कार्यक्रमात पत्रकार अनंत तापेकर यांचा सन्मान; पत्रकारिता व क्रीडा क्षेत्रातील योगदानाची दखल
( रत्नागिरी ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२३व्या भागानिमित्त रत्नागिरी येथे आयोजित विशेष कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार आणि कुस्तीपटू अनंत तापेकर यांचा सन्मान करण्यात आला. भारतीय…
धामणीत वर्दळीच्या ठिकाणी बिबट्याचा मुक्त संचार; बिबट्या सीसीटीव्हीत कैद
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) संगमेश्वर तालुक्यातील धामणी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून, मानवी वस्तीत या वन्यप्राण्याच्या उपस्थितीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, ब्राह्मणवाडी परिसरातील गजबजलेल्या भागात…
खेडातील नातूनगरच्या तरुणाचा मुंबईत अपघाती मृत्यू
( खेड /प्रतिनिधी ) मुंबईतील मस्जिद बंदर रेल्वे स्थानकाजवळ लोकलमधून पडून नातूनगर (ता. खेड) येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. नौशाद नूरमोहम्मद कोंडेकर (वय २२) असे अपघातात मृत्यू झालेल्या…
दिवसाढवळ्या गोळीबार, गोळी थेट किचनमध्ये घुसली; चिपळूणमध्ये खळबळ
( चिपळूण ) शहरातील गोवळकोट रोड परिसरात आज रविवारी सकाळच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने केलेल्या गोळीबारामुळे एकच खळबळ उडाली. पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या अशरफ तांबे यांच्या घरातील किचनच्या खिडकीची काच फोडून गोळी…
नादुरुस्त बोटी उधाणात वाहत जाऊन थेट वस्तीत धडकल्या; किनारपट्टीवरील घरांचे मोठे नुकसान
( दापोली ) गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार वाऱ्यामुळे आणि वाढलेल्या समुद्राच्या लाटांमुळे दापोली तालुक्यातील आंजर्ले खाडी परिसरात खळबळ उडवणारी घटना घडली आहे. खाडीकिनारी नादुरुस्त अवस्थेत पडून असलेल्या बोटींना…

