(रायगड)
गणेशोत्सवाच्या सणाला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सुरक्षित आणि सुरळीत प्रवासासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने निर्णायक पाऊल उचलले आहे. २३ ऑगस्टपासून मुंबई-गोवा महामार्गावर १६ टन किंवा त्यापेक्षा जास्त वजनाच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी लागू करण्यात आली आहे.
बंदीचे वेळापत्रक
-
२३ ऑगस्ट सायंकाळी ६ वाजता ते २९ ऑगस्ट रात्री १२ वाजता
-
२ सप्टेंबर सकाळी ८ वाजता ते ४ सप्टेंबर रात्री ८ वाजता
-
६ सप्टेंबर सकाळी ८ वाजता ते ८ सप्टेंबर रात्री ८ वाजता
ही माहिती रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.
गणपतीपूर्वी महामार्ग पूर्णपणे सुस्थितीत ठेवू – मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची ग्वाही
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नुकत्याच रायगड जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. यावेळी त्यांनी गणेशोत्सवापूर्वी महामार्गाची दुरुस्ती पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, विरोधकांनी मंत्री भोसले यांच्या पाहणी दौऱ्यावर प्रश्न उपस्थित केले ज्जात आहेत. याबाबत आरोप आहे की, दौरा अतिशय धावपळीचा होता आणि परशुराम घाटात वारंवार होणाऱ्या अपघातांवर तसेच महामार्गाच्या दुरुस्तीच्या गरजेकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. रायगडनंतर रत्नागिरीकडे जाताना मंत्र्यांनी महामार्गाची पाहणी वेगाने आटोपल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.
अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदीमुळे महामार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. मात्र, प्रशासनाकडून महामार्गाच्या दुरुस्तीबाबत योग्य तो कार्यवाही करण्याची मागणीही वाढली आहे.

