(दापोली)
जुलै २०२५ मध्ये झालेल्या परदेशी वैद्यकीय पदवीधर परीक्षेचा FMGE निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत पूर्ण भारतातून एकूण उमेदवार ३७२०७, उत्तीर्ण ७४५२ अनुत्तीर्ण २९३२७, अनुपस्थित ११६८, रोखलेले ५ तसेच उत्तीर्णतेची टक्केवारी २०.०२% राहिली आहे.
मूळ पेवे तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरी व सद्यस्थितीत दापोली येथील रहिवाशी सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी ताजुद्दीन परकार यांचे सुपूत्र ताबीश ताजुद्दीन परकार यांनी अमेरिकन युनिव्हर्सिटी जॉर्जिया – जॉर्जियन येथून MBBS यशस्वी केल्यानंतर,
जुलैमध्ये आपल्या भारत देशात आयोजीत FMGE परीक्षेत 300 पैकी 220 गुण मिळवून दैदिप्यमान यश प्राप्त केले आहे
या यशाबद्दल डाॅ.ताबीश यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

