( संगमेश्वर /प्रतिनिधी )
तालुक्यातील आंबेड खुर्द येथील कुणबी भवनात कुणबी समाजाच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ७२ खेडे कुणबी समाजाच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या कुणबी समाजातील उमेदवारांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर समाजाच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य संतोषजी थेराडे, सुशील भायजे, सौ. विशाखा कुवळेकर, सौ. माधवी गीते, दत्ताराम लाखन, सौ. प्रिया सुवरे, महेश जड्यार, सौ. पाष्टे, सौ. शीतप यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये ओबीसी जिल्हाध्यक्ष शरदचंद्र गीते, सुरेश भायजी, कृष्णा हरेकर, मुंबई उच्च न्यायालयाचे वकील रोशन पाटील, प्रभाकर धनवडे, विजय कुळेकर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंटकर, तुकाराम येडगे, श्री लांबे, पत्रकार रमेश डिके, कडवंईचे उपसरपंच दत्ताराम ओकटे, पत्रकार संदेश जिमन आदींची उपस्थिती होती. बहुसंख्येने समाजबांधव व भगिनींनी कार्यक्रमास हजेरी लावून एकात्मतेचा संदेश दिला.
सत्कारास उत्तर देताना सर्व निवडून आलेल्या सदस्यांनी “लोकाभिमुख विकास हीच आमची बांधिलकी” असल्याचे स्पष्ट केले. समाजाची एकजूट अबाधित ठेवत सर्व घटकांच्या प्रगतीसाठी काम करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. वकील रोशन पाटील यांनी मार्गदर्शन करताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचा इतिहास उलगडत स्वराज्याच्या संकल्पनेतून सामाजिक संघटनशक्तीचे महत्त्व अधोरेखित केले. “शिवचरित्र हा प्रेरणेचा अखंड स्रोत आहे,” असे ते म्हणाले. राजेंद्र पोमेंडकर यांनी विजयी सदस्यांचे अभिनंदन करून “आता राजकीय यश समाजकारणासाठी समर्पित करा,” असा संदेश दिला.
नक्की वाचा: ग्रामपंचायतींसाठी मोठा निर्णय: मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी विद्यमान सरपंचच प्रशासक
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत किंजलकर यांनी केले. समारोपानंतर सर्व उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. तसेच कोकणच्या लोककलांचा आविष्कार सादर करणारा ‘श्री समर्थ कृपा रिमिक्स नमन’ हा सांस्कृतिक कार्यक्रम रंगला. विजयी उमेदवारांमध्ये कुणबी समाजाचे लक्षणीय प्रतिनिधित्व झाल्याने उपस्थितांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण होते. शिवजयंतीच्या निमित्ताने झालेला हा सत्कार सोहळा समाजातील ऐक्य, नेतृत्वाची नवी उभारी आणि लोकाभिमुख कार्याची दिशा अधोरेखित करणारा ठरला आहे.
नक्की वाचा: संगमेश्वर कसबा येथे दुहेरी शोक: वर्षभरात मुलीनंतर वडिलांचाही अपघाती मृत्यू
संगमेश्वर: कोंडये येथील 42 वर्षीय मतिमंद महिला बेपत्ता; संगमेश्वर तालुक्यात खळबळ
व्हिडीओ: MPCB अध्यक्ष सिद्धेश कदम यांची पत्रकार परिषद | त्या कंपनीला दिला इशारा
खेड: लग्नसोहळ्यातील गडबडीत दोन लाखांहून अधिक किमतीचे दागिने लंपास

