(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील कोंडये, मधलीवाडी येथील 42 वर्षीय मंगल बाबाजी शीतप या मतिमंद महिलेचा 16 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी सुमारे 8.00 वाजल्यापासून पत्ता लागलेला नाही. त्या कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेल्याने कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी शोधाशोध केली; मात्र त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाणे येथे नापता क्रमांक 04/2026 अशी नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली असून, अद्याप तिचा शोध न लागल्याने कुटुंबीय चिंतेत आहे. संबंधित महिलेबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास तात्काळ संगमेश्वर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

