गणेशोत्सवातील दुर्दैवी घटना : विसर्जनावेळी युवक जगबुडी नदीत बुडाला
(खेड / प्रतिनिधी) खेड तालुक्यातील अलसुरे येथे दीड दिवसांच्या गणपती विसर्जनादरम्यान शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. मंगेश पाटील (रा. भोस्ते पाटीलवाडी) हा युवक जगबुडी नदीच्या पाण्यात बुडाल्याची घटना…
कालवे काढण्यासाठी गेलेल्या महिलेचा पाण्यात पडून मृत्यू
(रत्नागिरी) रत्नागिरी तालुक्यातील गावडेआंबेरे (हनुमानवाडी) येथे कालवे काढण्यासाठी गेलेल्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. जिलानी जितेंद्र डोर्लेकर (वय ४३, रा. खारवीवाडा) असे या महिलेचे नाव आहे. मंगळवारी…
चोरीच्या उद्देशाने लपून बसलेल्या दोघांवर पोलिसांची कारवाई
(रत्नागिरी) रत्नागिरी शहराजवळील कर्ला–मारुती मंदिर रस्त्यालगत संशयास्पदरीत्या लपून बसलेल्या दोघांविरुद्ध शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. चोरी करण्याच्या उद्देशाने हे दोघे तिथे थांबले असल्याचा संशय पोलिसांना आला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल…
रत्नागिरीत पार्किंगचा पेच; बाजारपेठेत वाहनचालक त्रस्त
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहनांमुळे पार्किंगचा प्रश्न अधिकच गंभीर होत चालला आहे. विशेषतः बाजारपेठ व गर्दीच्या परिसरात वाहन कुठे उभी करावी, हा प्रश्न वाहनचालकांना सतावत आहे. शहरातील…
एनआरएचएम कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद; जिल्ह्यातील आरोग्यसेवा विस्कळीत
(रत्नागिरी / प्रतिनिधी) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनआरएचएम) कार्यरत असलेले कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी १९ ऑगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलनावर गेले आहेत. राज्यभरातील सुमारे ८०० कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यासह…
१७ वर्षांच्या कारावासानंतर अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन
( मुंबई ) मुंबईच्या अंडरवर्ल्डमधील कुख्यात व्यक्तिमत्त्व आणि माजी आमदार अरुण गवळी यांना सर्वोच्च न्यायालयाने १७ वर्षांनंतर जामीन मंजूर केला आहे. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्याकांड प्रकरणात गवळींना २०१२ मध्ये…
उक्षी घाटात कार दरीत कोसळली; दाम्पत्य किरकोळ जखमी
(संगमेश्वर) वांद्री उक्षी मार्गे रत्नागिरी महामार्गावरील उक्षी–करबुडे घाट रस्त्यात आज दुपारी एका चारचाकीचा भीषण अपघात झाला. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती सुमारे २५ फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात गाडीत असलेले…
लग्नाचे आमिष, साडेसहा लाखांचा गंडा! संगमेश्वरातील तरुणाची ठाण्यातील महिलेने केली फसवणूक
(रत्नागिरी -संगमेश्वर /प्रतिनिधी) ऑनलाईन मॅट्रिमोनियल वेबसाइटच्या माध्यमातून विवाहासाठी परिचय करून देण्याच्या आड संगमेश्वरातील एका तरुणाची तब्बल ₹६ लाख ६२ हजार ६१० रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या…
गणेशोत्सवासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक योजनेमध्ये नोंदणी करुन फार्मर आयडी काढा – जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह
(रत्नागिरी) गणेशोत्सवासाठी गावाकडे येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक योजनेमध्ये नोंदणी करून फार्मर आय डी काढून घ्या, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले आहे. महसूल, कृषि व ग्रामविकास विभागाची आढावा…
गणपतीपुळे येथे घरफोडी; दोन चोरटे पोलिसांच्या ताब्यात; अवघ्या ५ तासाच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळल्या
(वैभव पवार / गणपतीपुळे) गणपतीपुळेतील केदारवाडी परिसरात एका घरात मोठी घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ₹२ लाख ३६ हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा…

