(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मराठी रंगभूमीवरील एक उल्लेखनीय नाट्यप्रयोग म्हणून नावारूपास आलेले ‘पाकीट’ हे दोन अंकी मराठी नाटक आता रत्नागिरीकरांच्या भेटीला येत आहे. ‘चारिका थिएटर्स’च्या निर्मितीखाली आणि दिग्दर्शक श्री अभिमान अजित यांच्या दिग्दर्शनाखाली रंगमंचावर येणारे हे नाटक १५ मे २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता स्वा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी (A/C) येथे सादर होणार आहे.
या नाटकाने नुकत्याच पार पडलेल्या ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेत जबरदस्त यश मिळवले आहे. सर्वोत्कृष्ट नाटक (प्रथम), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (द्वितीय), सर्वोत्कृष्ट अभिनय (प्रथम) आणि सर्वोत्कृष्ट नेपथ्य (प्रथम) असे चार बहुमान या नाटकाने पटकावले आहेत. नाटकाचे लेखक व दिग्दर्शक श्री अभिमान अजित असून निर्मिती सुचिता सुहास पवार, स्मिता सावंत गिरीश जाधव यांनी केली आहे. या नाटकात प्रमुख भूमिका साकारणारे सर्व कलाकार हे कोकणातील आहेत. या नाटकात समाजातील सध्याच्या मानसिकतेवर मार्मिक भाष्य करत मानवी नातेसंबंध आणि मूल्यांवर चिंतन करणारी कथा प्रभावीपणे मांडली आहे. तसेच हे नाटक लोकशाहीला आरसा दाखवणारे आहे.
प्रवेशिका केवळ ₹१५० व ₹१०० दरात उपलब्ध असून, तिकीटविक्री ७ मेपासून नाट्यगृहात सुरु आहे. फोन बुकिंगसाठी महेंद्र रावनंक (९६९९१२९३५१) यांच्याशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी विजय जाधव (८००७०७०१२१) किंवा विनित (८४४६१७९८०६) यांच्याशी संपर्क साधता येईल.