(खेड)
लोटेचे सरपंच चंद्रकांत चाळके यांच्या अध्यक्षतेखाली आणि भरत बजागे यांच्या सहकार्याने, रत्नागिरी जिल्हा शरीरसौष्ठव असोसिएशनच्या मान्यतेने जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, २५ मे रोजी सायंकाळी ६ वाजता लोटे ग्रामपंचायतजवळ पार पडणार आहे. या स्पर्धेत एकूण १ लाख ७ हजार रुपयांची पारितोषिके आणि सन्मानचिन्हे देण्यात येणार आहेत. स्पर्धा दोन प्रमुख प्रकारांमध्ये घेतली जाणार आहे:
1. “श्री लोटे सरपंच” स्पर्धा (उंची गट)
-
एकूण ४ उंची गट
-
प्रत्येक गटात १ ते ७ क्रमांक जाहीर
-
विजेत्यांना रोख पारितोषिके आणि शिल्ड
-
विशेष पारितोषिके: ‘उगवता तारा’ आणि ‘बेस्ट पोझर’ – यांनाही रोख बक्षिसे व आकर्षक चषक
2. “श्री लोटे सरपंच मेन फिजिक्स 2025” स्पर्धा
-
एकूण २ गट
-
प्रत्येक गटात १ ते ५ क्रमांक
-
विजेत्यांना रोख रक्कम व शिल्ड
-
दोन्ही किताब विजेत्यांना (टायटल विनर) – विशेष मानाचा पट्टा, रोख रक्कम आणि आकर्षक सन्मानचिन्ह
प्रत्येक सहभागी स्पर्धकाला अल्पोपहार आणि एस.टी. प्रवासाचा खर्च (एक वेळचा) दिला जाणार आहे.
या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शरीरसौष्ठवपटूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन सदानंद जोशी (अध्यक्ष – रत्नागिरी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव असोसिएशन) आणि जितेंद्र नाचणकर (सेक्रेटरी – रत्नागिरी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव असोसिएशन) यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क करा:
-
सदानंद जोशी – 📞 9422372296
-
जितेंद्र नाचणकर – 📞 9423291514
-
भरत बजागे – 📞 9423391723

