(नवी दिल्ली)
पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने भर्तवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारताने तो सपशेल हाणून पाडला. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानची बोलती बंद केली आहे. आता ऑपरेशन सिंदूरवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारताच्या सुरक्षा दलांना पूर्णपणे पाठिंबा दिला आहे. तसेच ऑपरेशन सिंदूरचे कौतुक देखील केले आहे. “आम्ही पहलगाममधील पर्यटकांवर पाकिस्तान नियोजित दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला केंद्र सरकार आणि सुरक्षा दलांनी केलेल्या ऑपरेशन सिंदूरबद्दल त्यांचे अभिनंदन करतो”, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
संकटाच्या काळात आरएसएस सरकारच्या सोबत
भारताने पाकिस्तानला दिलेल्या प्रत्युत्तरावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने म्हटले की, “देशाच्या संरक्षणासाठी दहशतवादी आणि त्यांच्या पायाभूत सुविधांवर कारवाई करणे आवश्यक आहे. याच्याशी आम्ही संपूर्ण सहमत आहोत. या संकटाच्या काळात संपूर्ण देशवासी सुरक्षा दले आणि सरकारच्या पाठीशी आहे.”
संघाचे नागरिकांना आवाहन
सरकार आणि प्रशासन डेट असलेल्या सुचनांचे पालन करावे. आपल्या सर्वांना सावध आणि सतर्क राहायचे आहे. तसेच राष्ट्रविरोधी कोणत्याही शक्तीला त्यांचे हेतू साध्य होऊ द्यायचे नाहीयेत. त्यासाठी देशवासीयांनी सतर्क राहावे असे आवाहन संघाने नागरिकांना केले आहे.
सांबा सेक्टरमध्ये BSF ची मोठी कारवाई
भारताने हवाई दल, नौदल आणि लष्कर तीनही दलांनी पाकिस्तानवर काउंटर अटॅक केला आहे. मात्र जम्मू काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये बीएसएफने 7 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. बीएसएफचे जवान सीमेवर डोळ्यात तेल घालून गस्त घालत आहेत. भारत पाकिस्तान यांच्यात हल्ले-प्रतिहल्ले सुरू असतानाच 7 दहशतवादी भारतात घुसण्याच्या प्रयत्नांत होते. सात दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत होते. मात्र आधीपासूनच सीमेवर तैनात आणि सजग असणाऱ्या बीएसएफच्या जवानांनी या 7 ही घुसखोरांना कंठस्नान घातले आहे.
इकडून भारत तर दुसरीकडून BLA ने केले भीषण हल्ले
पाकिस्तानने काल दिवसभरात जम्मू एअरपोर्टवर मिसाईल अटॅक करण्याचा प्रयत्न केला आहे.त्यानंतर राजधानी इस्लामाबाद, सियालकोट, भावलपूर, लाहोर या शहरात भारताने मोठे हल्ले केले आहेत. तर आता भारतीय हवाई दलाचे तेजस, सुखोई ही लढाऊ विमाने सीमेवर घिरट्या घालत आहेत. कुपवाडा आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर जोरदार गोळीबार सुरू आहे.
भारताने एका बाजूने काउंटर अटॅक केला असतानाच पाकिस्तानमध्ये बलुच आर्मीने देखील पाकिस्तानच्या सैन्य दलांवर हल्ले सुरू केले आहेत. त्यामुळे पाकिस्तानला नक्की कोणाचा सामना करायचं हे समजत नाहीये. पाकिस्तानने त्यांच्या आर्मी चीफ असीम मुनिरला देखील अटक केल्याचे समजते आहे. बलुच आर्मीने पाकिस्तानच्या सैन्यावर भीषण हल्ले चढवले आहेत.