चिपळूण : २३ वर्षीय तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या
(चिपळूण) शहरातील मार्कंडी परिसरात एका २३ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. मृत तरुणाची…
इलाका किसीका भी हो, धमाका निलेश राणेच करणार! रवींद्र चव्हाणांशी पंगा घेणाऱ्या निलेश राणेंचं शिंदेंकडून तोंड भरून कौतुक
(सिंधुदुर्ग) “कोकणात दगड प्रसिद्ध आहे चिरा… पण शिवसेनेला कोकणात सापडला आहे खरा हिरा!” अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांचे जोरदार कौतुक केले. “शिंदे साहेबांना…
महायुतीत अंतर्गत कलह वाढला! स्थानिक स्वराज्य निवडणूकांमध्ये बेबनाव
(मुंबई) महायुतीची सत्ता जरी एकत्र येऊन प्रस्थापित झाली असली, तरी तिन्ही पक्षांतील म्हणजेच अजित पवार गटाची राष्ट्रवादी, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांचा अंतर्गत अविश्वास आणि राजकीय कुरघोडी सातत्याने…
डायबेटीसवरील अद्ययावत उपचारपद्धतींचे सखोल मार्गदर्शन; CGPAचा उपक्रम, डॉक्टरांचा उत्स्फूर्त सहभाग
(चिपळूण) 'वर्ल्ड डायबेटीस डे' च्या पार्श्वभूमीवर चिपळूण जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (CGPA) तर्फे हॉटेल अतिथी ग्रँड येथे डायबेटीसवरील अद्ययावत उपचारपद्धती, रुग्ण व्यवस्थापन आणि गुंतागुंत प्रतिबंध यावर केंद्रित विशेष वैद्यकीय मार्गदर्शन कार्यक्रम…
महामार्गावर असुर्डे येथे बेकायदेशीर खैर वाहतूक पकडली; वन विभागाची धडक कारवाई
( चिपळूण ) महामार्गावर असुर्डे येथे विनापास खैर लाकूड वाहतूक करणाऱ्या वाहनावर वन विभागाने कारवाई केली आहे. वनपाल अधिकारी रेशमा कावळे व जाधव यांच्या पथकाने रविवारी सकाळी सुमारे ९.३० वाजता…
आंजर्ले–दापोली मार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सहा जण जखमी
( दापोली ) आंजर्ले ते दापोली मार्गावर सालदुरे एसटी थांब्याजवळ रविवार (३० नोव्हेंबर) रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास एका चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाला. गाडीचा ताबा सुटल्यामुळे गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या…
हिवाळ्यात टाचांना भेगा! तज्ज्ञांनी सांगितले प्रभावी घरगुती उपाय
हिवाळ्यात अनेक जणांना भेडसावणारी एक मोठी समस्या म्हणजे पायांच्या टाचांवर पडणाऱ्या भेगा. कोरडी हवामान, त्वचेतल्या आर्द्रतेची कमतरता आणि पायांची योग्य देखभाल न केल्यामुळे या समस्या वाढतात. टाचा फुटल्याने वेदना होतात,…
‘श्रद्धांजली’ स्टेटस ठेवत पतीनं पत्नी व दोन मुलांचा केला अंत, नंतर स्वतःचाही घेतला जीव
(नाशिक) नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात रविवारी सकाळी उघडकीस आलेल्या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली. फुले माळवाडी शिवारात एकाच कुटुंबातील चार जण मृतावस्थेत सापडल्यामुळे नागरिकांना मोठा धक्का बसला. 40 वर्षीय गोविंद…
जास्त ‘स्क्रीनटाइम’चे दुष्परिणाम : स्मार्टफोन व्हिजन सिंड्रोमचा वाढता धोका
आजच्या काळात स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. दिवसातील चोवीस तासांपैकी बहुतांश वेळ आपण स्क्रीनसमोर घालवत असतो. फोन, संगणक किंवा टॅब्लेट. ऑफिसमध्ये काम करणारे अनेक जण दररोज ९…
थंडीत हृदयविकाराचा धोका अधिक! हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्याचे “हे” आहेत संकेत
हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका लक्षणीय वाढतो. थंडीमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, रक्तदाब वाढतो आणि हृदयावर अतिरिक्त ताण येतो. त्यामुळे कोरोनरी आर्टरी डिजीज (CAD) किंवा हार्ट ब्लॉकेज होण्याची शक्यता जास्त असते. जागतिक आरोग्य…

