( राजापूर )
राजापूर हायस्कूलने पुन्हा एकदा शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटवत इयत्ता आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2026 मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत शाळेतील तब्बल 11 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये निर्जरा रतन पाटील, पद्मलक्ष्मी निलेश गोंडाळ, स्वरा अनिल गुरव, सानवी सदाशिव सरखोत, गार्गी विजय सावंत, संस्कृती संतोष ऐणारकर, अथर्व नारायण धोपटे, प्रतीक अनिल पांचाळ, विश्वजीत महादेव करडे, प्रीतम पुरुषोत्तम सुर्वे आणि पियुष संदीप गोतावडे यांचा समावेश आहे. यापैकी निर्जरा रतन पाटील आणि अथर्व नारायण धोपटे यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावत शाळेच्या यशात आणखी मानाचा तुरा खोवला आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे पदाधिकारी सतीश रहाटे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती विभाग प्रमुख युवराज माळवी आणि सौ. बिराजदार मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक ए. बी. पवार, उपमुख्याध्यापक जानकर, पर्यवेक्षक कुंभार तसेच माजी पर्यवेक्षिका श्रीमती दर्शना मांडवकर यांची प्रेरणा आणि भक्कम पाठबळ या यशामागे लाभले.
विद्यार्थ्यांची मेहनत, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यास तसेच शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळे हे यश शक्य झाल्याची भावना व्यक्त होत असून, या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळेतील शिक्षक, पालक आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

