डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ रत्नागिरीत सोमवारी डॉक्टरांचा लाक्षणिक संप; १२० डॉक्टरांच्या ओपीडी सेवा बंद
२४ तास नियमित वैद्यकीय सेवा बंद; अत्यावश्यक सेवा सुरू राहणार, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार
भारताचा अंतराळ इतिहास घडला! स्कायरूटच्या ‘विक्रम-1’चे यशस्वी प्रक्षेपण; पंतप्रधान मोदींकडून तरुण शास्त्रज्ञांचे कौतुक
(नवी दिल्ली / श्रीहरिकोटा ) भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्रासाठी ऐतिहासिक क्षण ठरलेल्या स्कायरूट एअरोस्पेसच्या 'विक्रम-1' या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे आज (शनिवारी) यशस्वी प्रक्षेपण झाले. या यशस्वी मोहिमेनंतर पंतप्रधान नरेंद्र…
राजापूर युवा सेनेचा स्तुत्य उपक्रम; पाचल येथील जि.प. शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुका युवा सेनेच्या वतीने पाचल येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ आणि ३ मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळावी…
मालगुंड-गणपतीपुळे परिसरात भटक्या गोवंशाचा प्रश्न गंभीर; शासकीय गोशाळा उभारण्याची मागणी
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड-गणपतीपुळे परिसरात भटक्या गोवंशाची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यांच्या संगोपनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. पर्यटन व्यवसायाच्या वाढत्या प्रभावामुळे अनेकांनी शेती आणि पशुपालनाकडे पाठ फिरवल्याने…
सह्याद्री कला महाविद्यालयाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांचे मुंबईत चित्रकला प्रदर्शन; २१ जुलै ते ३ ऑगस्टदरम्यान कलारसिकांना पर्वणी
(संगमेश्वर / प्रतिनिधी) सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सावर्डे येथील सह्याद्री कला महाविद्यालयाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे भव्य चित्रकला प्रदर्शन २१ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत मुंबईतील द आर्ट एन्ट्रन्स, आर्मी अँड…
खेर्डी-चिंचघरी (सती) विद्यालयात NDRF कडून आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा; विद्यार्थ्यांना CPR व बचावकार्याचे प्रात्यक्षिक
(चिपळूण / वार्ताहर) सह्याद्री शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, खेर्डी-चिंचघरी (सती) येथे भारत सरकारच्या गृह मंत्रालयाअंतर्गत कार्यरत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), पुणे यांच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन…
ताब्यातील मालमत्तेचे अधिकृत सील तोडून बेकायदा प्रवेश; चिपळूणमध्ये चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
(चिपळूण/ रत्नागिरी प्रतिनिधी) न्यायालयीन आणि प्रशासकीय आदेशानुसार ताब्यात घेण्यात आलेल्या मालमत्तेवरील अधिकृत सील व शिक्के तोडून बेकायदेशीररित्या प्रवेश करून तेथे वास्तव्यास राहिल्याचा गंभीर प्रकार चिपळूण तालुक्यात उघडकीस आला आहे. या…
24 न्यूजचा IMPACT! : सावित्रीतील बार्ज प्रकरणात अखेर कारवाई; ‘बंदीत बार्जेस कुठून आल्या?’ या सवालानंतर प्रशासनाला जाग, बार्ज मालकाविरुद्ध गुन्हा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) 'बंदीच्या काळात सावित्री नदीत बार्जेस आल्याच कशा?' असा जाहीर सवाल उपस्थित करत या प्रकरणाकडे सर्वप्रथम लक्ष वेधणारे वृत्त रत्नागिरी 24 News ने प्रसिद्ध केले होते. अतिवृष्टीचा इशारा…
लांज्यातील भीषण अपघातप्रकरणी कारचालकासह डंपर चालकावर गुन्हा; चौघांच्या मृत्यूनंतर पोलिसांची कारवाई
(लांजा /रत्नागिरी प्रतिनिधी) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लांजा तालुक्यातील अद्वैत पेट्रोल पंपाजवळ १५ जुलै रोजी झालेल्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला होता. गोव्याहून मुंबईकडे निघालेली क्रेटा कार महामार्गावर उभी असलेल्या…
बॅलर चुकवताना ट्रक थेट गटारात; जीवितहानी टळली, पण प्रश्न कायम
(रत्नागिरी /प्रतिनिधी) लांजा तालुक्यातील भीषण अपघाताची धग अद्याप कायम असतानाच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक वाहतूक व्यवस्थेचा आणखी एक नमुना शुक्रवारी (१७ जुलै) सकाळी पालीजवळील कापडगाव-नागलेवाडी परिसरात समोर आला. वाहनांचा वेग…

