शिक्षक समिती, खेडच्या वतीने विद्यार्थी व शिक्षकांचा भव्य गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न
(खेड / वार्ताहर) महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, खेड शाखेच्या वतीने आयोजित विद्यार्थी व शिक्षक गुणगौरव सोहळा जोगळे बंधू मल्टीपर्पज हॉल, भरणे येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष…
भर पावसात शिक्षकाचे एकाकी आंदोलन; सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ चिपळूणमध्ये अनोखे निदर्शन
(चिपळूण/ प्रतिनिधी) दिल्लीतील जंतर-मंतर येथे शिक्षणातील उत्तरदायित्व आणि नीट पेपरफुटी प्रकरणातील जबाबदारी निश्चित करण्याच्या मागणीसाठी उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ चिपळूणमध्ये एका शिक्षकाने भर पावसात एकट्याने उभे राहून…
आजीच्या अंत्ययात्रेला दुचाकीवरून निघालेल्या तरुणाचा आंबा घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू
(देवळे /प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज पहाटे उघडकीस आली. दख्खन बसथांब्यापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर…
युक्रांदचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन; गांधीवादी विचारवंत, समाजचिंतक आणि माजी आमदार काळाच्या पडद्याआड
(पुणे / वृत्तसंस्था) महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि वैचारिक क्षेत्रातील एक प्रभावी व्यक्तिमत्त्व, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष तसेच 'युवक क्रांती दल' (युक्रांद)चे संस्थापक डॉ. कुमार गणेश सप्तर्षी यांचे आज (शनिवारी,…
ठाकरे गटातील 6 खासदारांच्या शिंदे गटात विलनीकरणास लोकसभा अध्यक्षांची मंजुरी; शिवसेनेचे संख्याबळ 13 वर
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून फुटून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झालेल्या सहा खासदारांच्या विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज (शनिवारी) अधिकृत मंजुरी दिली.…
देवरुख आगाराचा ‘रामभरोसे’ कारभार; मोडक्या एसटीमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात, ‘दे धक्का’ची वेळ
(संगमेश्वर / एजाज पटेल) राज्य परिवहन महामंडळाकडून सातत्याने तिकीट दर वाढविले जात असताना प्रवाशांना मिळणारी सेवा मात्र दिवसेंदिवस खालावत चालल्याचा आरोप होत आहे. देवरुख आगारातील अनेक एसटी बस मोडकळीस आलेल्या…
पाली भाषेच्या डिप्लोमा अभ्यासक्रमात रत्नागिरी जिल्ह्याचा शंभर टक्के निकाल; बुद्धविचारांच्या अध्ययनाला नवी दिशा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) तथागत भगवान बुद्धांच्या उपदेशाचे मूळ स्वरूप समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी पाली भाषा शिकण्याकडे रत्नागिरी जिल्ह्यातील अभ्यासकांचा वाढता कल अधोरेखित झाला आहे. मुंबई विद्यापीठ संलग्न सिद्धार्थ…
अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांना तीर्था कॉस्मेटिक चे सर्वेसर्वा नंदकुमार शेट्ये यांची वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट; पोलीस प्रशासनाच्या कार्याचे कौतुक
(राजापूर / तुषार पाचलकर) रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरातील सुप्रसिद्ध तीर्था कॉस्मेटिकचे सर्वेसर्वा तथा उद्योजक नंदकुमार शेट्ये यांनी रत्नागिरीचे अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांची वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट घेत…
भंडारपुळे किनाऱ्यावर दोन समुद्री कासवांना जीवदान; तरुणांच्या सतर्कतेमुळे जाळ्यातून सुखरूप मुक्तता
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी तालुक्यातील भंडारपुळे समुद्रकिनाऱ्यावर मासेमारीच्या जाळ्यात अडकलेल्या दोन दुर्मिळ समुद्री कासवांना स्थानिक तरुणांनी वेळेवर मदत करत जीवदान दिले. त्यांच्या सतर्कतेमुळे कासवांची सुरक्षित सुटका होऊन त्यांना पुन्हा समुद्रात…
डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ रत्नागिरीत सोमवारी डॉक्टरांचा लाक्षणिक संप; १२० डॉक्टरांच्या ओपीडी सेवा बंद
२४ तास नियमित वैद्यकीय सेवा बंद; अत्यावश्यक सेवा सुरू राहणार, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार

