(रत्नागिरी / वार्ताहर)
बहुजन समाज पार्टीच्या वतीने प्रदेश सचिव राजेंद्र आयरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. यंदा आयरे साहेबांच्या अचानक निधनामुळे त्यांच्या जयंतीनिमित्त हे रक्तदान शिबिर शासकीय रुग्णालयातील रक्तपेढीत आयोजित करण्यात आले.
यावेळी रत्नागिरी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष मिलिंद किर म्हणाले, “आज राजेंद्र आयरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या अचानक निधनाने जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर घेण्याची वेळ आपल्यावर आली, ही दुःखदायक गोष्ट आहे. आयरे साहेब हे चळवळीतील आदर्शवत नेतृत्व होते. आपल्याला त्यांचे नेतृत्व अजून हवे होते. त्यांच्यासमवेत काम करताना खूप प्रेरणा मिळाली. त्यांचे कार्य कायम प्रेरणादायी आणि अजरामर ठरेल. आज त्यांच्या जयंतीदिनी ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले, त्यामुळे रुग्णांना नवीन जीवनदान मिळेल. हेच खरे श्रेष्ठदान ठरेल.”
या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत चांगले सहकार्य केले. यावेळी रत्नागिरी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष मिलिंद किर, तैलिक समाज सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सचिन लांजेकर, भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष रत्नदीप कांबळे, थिबा राजा कालीन संघर्ष समितीचे ज्येष्ठ धडाडीचे कार्यकर्ते दिवेन कांबळे, अॅड. प्रविण कांबळे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा क्षेत्र प्रभारी अनिकेत पवार, बसपा रत्नागिरी विधानसभा अध्यक्ष राजेश सावंत, प्रभारी किशोर पवार, उपाध्यक्ष अनंत पवार, कोषाध्यक्ष दीपक आयरे, सचिव राकेश पवार, वाटद सेक्टरचे सुहास पवार, चांदेराई सेक्टरचे दीपक कांबळे, अशोक नगरचे महेश कांबळे, कल्पेश हातखंबेकर आणि मोहिते अॅम्ब्युलन्स सर्व्हिसचे किशोर मोहिते उपस्थित होते.
रक्तदान शिबिरासाठी शासकीय रक्तपेढीचे डॉ. सूरज निकम, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी मधुरा भोसले, डॉ. स्नेहा भोसले, इनचार्ज सुवर्णा जोशी, टेक्निशियन भारती भोसले, परिचारिका जयश्री कुंडलकर आणि दीप्ती जाधव यांच्यासह रक्तपेढीच्या सर्व स्टाफचे चांगले सहकार्य मिळाले.

