(कळझोंडी / किशोर पवार)
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) रत्नागिरी तालुका अध्यक्षपदी मंगेश सावंत, तर सरचिटणीसपदी उज्वल तथा बंटी कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
रत्नागिरी जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) जिल्हा कार्यकारिणी आणि तालुका कार्यकारिणी सदस्यांची संयुक्त सभा रत्नागिरी येथील मारुती मंदिर परिसरातील मिथिला हॉटेलच्या शेषाराम सभागृहात जिल्हाध्यक्ष प्रीतम रुके यांच्या अध्यक्षतेखाली आणि कोकण प्रदेशाध्यक्ष प्रकाश मोरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडली.
या सभेला राज्य कार्यकारिणी सदस्य दादासाहेब मर्चंडे, कोकण संघटक रवींद्र ओव्हाळ, युवक प्रदेशाध्यक्ष सुशांत सकपाळ, रत्नागिरी जिल्हा युवक अध्यक्ष तथा सोशल मीडिया आयटी सेल अध्यक्ष प्रतिशोध कदम यांच्यासह विविध तालुक्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
सभेत १६ ऑगस्ट रोजी झालेल्या जिल्हा मेळाव्याची माहिती देण्यात आली. तसेच मेळाव्याचा जमाखर्च अहवाल सादर करण्यात आला. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या सामाजिक समता मार्च कार्यक्रमाची संभाव्य माहिती देण्यात आली.
यानंतर रत्नागिरी तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या तालुका कार्यकारिणीची नव्याने निवड करण्यात आली. अध्यक्षपदी मंगेश सावंत, तर सरचिटणीसपदी उज्वल तथा बंटी कांबळे यांची निवड करण्यात आली. बंटी कांबळे यांची सरचिटणीसपदी याच पदासाठी फेरनिवड करण्यात आली.
नवीन कार्यकारिणीत सुनील कांबळे, दीपक कांबळे आणि सुगंध कदम यांची उपाध्यक्षपदी, नरेश कांबळे आणि तुषार पावसकर यांची चिटणीसपदी, कुलदीप जाधव यांची खजिनदारपदी, किशोर पवार यांची प्रवक्तेपदी, तर विलास कांबळे, जे. पी. जाधव आणि रजत पवार यांची सदस्यपदी निवड करण्यात आली. भाई जाधव यांची कोकण प्रदेश सदस्यपदी, विलास कांबळे यांची जिल्हा कोषाध्यक्षपदी आणि रजत पवार यांची जिल्हा सदस्यपदी निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित सर्व कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचे दादासाहेब मर्चंडे, प्रकाश मोरे आणि सुशांत सकपाळ यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व भावी कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हाध्यक्ष प्रीतम रुके यांच्या नियोजनातून ही सभा पार पडली.

