दापोली: वाकवलीत शासकीय कृषी विज्ञान पदव्युत्तर संस्था उभारणार; सविस्तर प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश
(मुंबई / वृत्तसंस्था) कोकणातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर कृषी शिक्षणासोबतच अत्याधुनिक संशोधनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रत्नागिरीतील वाकवली येथे नवीन शासकीय कृषी विज्ञान पदव्युत्तर संस्था स्थापन करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. या…
रेल्वे स्टेशन रोडवरील रानटी झाडांनी गिळंकृत केला दुभाजक; संबंधित अधिकारी झोपेतच?
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रेल्वे स्टेशन सुशोभीकरणाच्या नावाखाली कोरीव दगडाचे बांधकाम करून दुभाजकात लावलेल्या शोभेच्या झाडांची देखभाल मात्र पूर्णपणे वाऱ्यावर सोडल्याचे चित्र रेल्वे स्टेशन रोडवर पाहायला मिळत आहे. पावसाळ्यामुळे शोभेच्या झाडांमध्ये…
साडवलीत विहिरीत पडलेल्या बिबट्याची थरारक सुटका; वन विभागाच्या तत्परतेमुळे वन्यजीवाला जीवदान
(संगमेश्वर/ प्रतिनिधी) साडवली (नैदरवाडी) येथील एका खाजगी विहिरीत पडलेल्या बिबट्याची वन विभागाने अत्यंत शिताफीने आणि धाडसी पद्धतीने सुटका करून त्याला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. या यशस्वी बचाव मोहिमेमुळे संभाव्य…
शिवसेना धनुष्यबाण प्रकरण: सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाचा जोरदार युक्तिवाद; कपिल सिब्बल म्हणाले, ‘लोकशाहीवर गंभीर परिणाम
(नवी दिल्ली / वृत्तसंस्था) शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यातील सुनावणी सुरू आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याच्या…
लालपरीच्या स्टीअरिंगवर ठेवला विश्वास अन् प्रवाशांना मानले कुटुंब; २८ वर्षांच्या निष्कलंक सेवेनंतर संतोष कीर भावुक निरोपाने सेवानिवृत्त
(संगमेश्वर / एजाज पटेल) कोकणातील नागमोडी वळणे, मुसळधार पाऊस, कडक ऊन आणि अवघड घाटरस्ते... या सगळ्यांवर मात करत हजारो प्रवाशांना त्यांच्या घरापर्यंत सुरक्षित पोहोचवणारी ‘लालपरी’ ही केवळ एसटी बस नाही,…
जमीन वाद आणि जादूटोण्याच्या संशयातून छळ; पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा
(राजापूर / रत्नागिरी) जमिनीच्या वादासह जादूटोण्याच्या संशयातून सातत्याने मानसिक छळ करून एका व्यक्तीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप करत राजापूर पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या…
किरबेटमध्ये गवारेड्यांचा धुमाकूळ; १४ शेतकऱ्यांच्या भातशेतीचे मोठे नुकसान
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील किरबेट येथे गवारेड्यांनी धुमाकूळ घालत तब्बल १४ शेतकऱ्यांच्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. ३ आणि ४ ऑगस्ट रोजी गवारेड्यांनी शेतात घुसून नुकतीच लावलेली…
मिऱ्या–नागपूर महामार्गावर उनाड गुरांचा विळखा; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाहनचालकांचा जीव टांगणीला
खेडशी ते हातखंबा दरम्यान पथदिव्यांची व्यवस्था करण्याकडे पालकमंत्री लक्ष देणार?
सरकारी रुग्णालयांतील रुग्णांच्या आहाराची जबाबदारी महिला बचतगटांकडे; २०० पेक्षा कमी खाटांच्या रुग्णालयांसाठी नवा निर्णय
(मुंबई / वार्ताहर) राज्यातील २०० पेक्षा कमी खाटा असलेल्या जिल्हा, उपजिल्हा आणि ग्रामीण सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांना आहार पुरविण्याची जबाबदारी आता महिला बचतगटांकडे सोपविण्यात येणार आहे. महिलांना रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी…
लांज्यात धावत्या टोयोटा कारला अचानक आग; चालकाने प्रसंगावधान राखत वाचवला जीव, कार जळून खाक
(लांजा / वार्ताहर) लांजा-तळवडे-दाभोळे-देवरूख मार्गावर धावत्या टोयोटा कारला अचानक आग लागून संपूर्ण वाहन जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी रात्री तळवडे फाट्यानजीक घडली. कारमधून अचानक धूर आणि मोठा आवाज येत असल्याचे…

