(देवळे / प्रकाश चाळके)
दाभोळे जिल्हा परिषद गटातील तसेच संगमेश्वर तालुक्यातील करंजारी येथील ज्येष्ठ शिवसैनिक विलास बेर्डे यांचा वाढदिवस देवळे येथील विभागीय शिवसेना शाखेत उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला लांजा-राजापूर-साखरपा विभागाचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत तसेच माजी मंत्री रवींद्रजी माने यांची उपस्थिती होती.
विलास बेर्डे हे संगमेश्वर तालुक्यातील जुने-जाणते ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून परिचित आहेत. माजी मंत्री रवींद्र माने यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध राहिले असून, आमदार किरण सामंत तसेच अण्णा सामंत यांच्याशीही त्यांचे पूर्वीपासूनचे घरोब्याचे संबंध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
‘विलास भाई’ या नावाने परिचित असलेले विलास बेर्डे हे गोरगरीब नागरिकांच्या प्रश्नांसाठी पुढाकार घेणारे आणि न्यायासाठी प्रयत्नशील राहणारे ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त दाभोळे जिल्हा परिषद गटासह इतर भागांतील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी विलास बेर्डे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांना दीर्घायुष्य लाभावे, अशी सदिच्छा व्यक्त केली.
या कार्यक्रमाला आमदार किरण सामंत, माजी मंत्री रवींद्र माने, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके, उपजिल्हाप्रमुख राजेश पत्त्यानी, विभागप्रमुख राजेश कामेरकर, संजय सुर्वे, शिवसेना युवा संघटना तालुकाप्रमुख प्रसाद अपंडकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, शिवसैनिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.


