जैतापूर बंदर कार्यालयाच्या मागे उभारलेला धोक्याची सूचना देणारा टॉवर निष्क्रिय!
टॉवर साखरी-नाटे डुंगेरी भागात हलविल्याशिवाय उपयोग नाही; मच्छीमारांची ठाम भूमिका
साखरी-नाटे बंदरात गाळसंचयाचा प्रश्न गंभीर; मच्छीमारांकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी
(जैतापूर / राजन लाड) राजापूर तालुक्यातील साखरी-नाटे बंदर हे जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे मच्छीमारी बंदर मानले जाते. या बंदरावर दररोज शेकडो लहान-मोठ्या बोटी आणि लाँचेस अरबी समुद्रात जाऊन मासेमारी करून…
युवा क्रिकेटपटू अविराज अनिल गावडेचा इंग्लंडमधील कौंटी स्पर्धेतील शानदार कामगिरीबद्दल सत्कार
(रत्नागिरी) रत्नागिरीचा युवा क्रिकेटपटू अविराज अनिल गावडे याने इंग्लंडमधील कौंटी स्पर्धेत केलेल्या भक्कम कामगिरीचे रत्नागिरीचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग व भाषा मंत्री ना. उदय सामंत यांनी कौतुक केले. अशा टॅलेंटेड…
विजयादशमीच्या दिवशी बिबट्याचे सीमोल्लंघन! भारताचे पहिले वन्यजीव नाटक ‘संगीत बिबत आख्यान’ चिपळूणमध्ये दाखल!
(रत्नागिरी) भारताच्या नाट्यपरंपरेत मैलाचा दगड ठरलेले, देशातील पहिले वन्यजीव नाटक म्हणून लौकिक मिळवलेले 'संगीत बिबत आख्यान' हे धमाल विनोदी नाटक २ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता चिपळूण येथील इंदिरा…
सणासुदीच्या काळात नारळाचे दर विक्रमी; भाव पन्नाशीपार
(रत्नागिरी) नारळ उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातच सध्या नारळाच्या भावांनी अक्षरशः विक्रमी मजल मारली आहे. स्थानिक बाजारपेठेत दर प्रति नारळ ५० रुपये किंवा त्याहून अधिक झाले आहे. या अभूतपूर्व वाढीमुळे…
आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक: सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे ; मुख्यालय सोडू नये – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
(रत्नागिरी) सध्याच्या पावसाळी परिस्थितीत जिल्ह्यातील सर्वच यंत्रणांनी सतर्क रहावे, मुख्यालय सोडू नये, अशा सूचना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिल्या. आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक रविवारी पालकमंत्री डाॕ सामंत यांनी घेतली.…
श्रेया योगेश कदम यांची नवरात्रोत्सवानिमित्त वरवली देऊळवाडीतील सोमजाई मंदिराला भेट
(खेड) राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश रामदास कदम यांच्या सौभाग्यवती श्रेया योगेश कदम यांनी नवरात्रोत्सवानिमित्त वरवली देऊळवाडी येथील श्री सोमजाई देवी मंदिराला भेट देत दर्शन घेतले. या प्रसंगी महिला जिल्हा प्रमुख सुप्रिया…
ग्राहक पंचायतीच्या खेड तालुका अध्यक्षपदी विजय येरुणकर यांची एकमताने निवड
(खेड) अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या कोकण प्रांतातील जिल्ह्यातील खेड तालुक्यातील अध्यक्षपदी बिजघर (ता. खेड) येथील प्रतिष्ठित व समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व श्री. विजय येरुणकर यांची निवड करण्यात आली आहे. सन 2025 ते…
लांजा वनक्षेत्रातील साग चोरी प्रकरणात अकरा आरोपी ताब्यात; पाच वाहने व साग माल जप्त
(रत्नागिरी / प्रतिनिधी) लांजा तालुक्यातील मौजे कुरणे (सर्व्हे नं. १९१/१) या राखीव वनक्षेत्रात झालेल्या सागवृक्ष चोरतुट प्रकरणात वन विभागाने मोठी कारवाई केली आहे. आतापर्यंत अकरा संशयित आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी…
श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या आनंदराव पवार महाविद्यालयाचा निलेश शिंदे याची मुंबई विद्यापीठ कबड्डी संघात निवड
(चिपळूण) २२ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर २०२५ दरम्यान डी.ए.व्ही. कॉलेज भांडुप आयोजित मरीन लाईन मुंबई येथे झालेल्या आंतर कबड्डी स्पर्धेत कोकण झोन कबड्डी मुलांच्या संघाने दुसरे स्थान पटकावले आहे. या…

