(रत्नागिरी)
युवकांचा सर्वांगीण विकास, सांस्कृतिक परंपरांचे जतन तसेच सुप्त कलागुणांना प्रोत्साहन मिळावे यासाठी भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयामार्फत दरवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. या महोत्सवाच्या जिल्हास्तरीय स्पर्धा दि. 20 नोव्हेंबर 2025 रोजी रत्नागिरी येथील जिल्हा क्रीडा संकुल, मारुती मंदिर (बॅडमिंटन हॉल) येथे संपन्न झाल्या.
या महोत्सवात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. महाविद्यालयाने मिळवलेले मानाचे क्रमांक पुढीलप्रमाणे—
उत्कृष्ट कामगिरी
लोकनृत्य: गट प्रथम
लोकगीत: गट प्रथम
चित्रकला स्पर्धा: प्राप्ती आलीम – प्रथम
वक्तृत्व स्पर्धा:
सिद्धी शिंदे – द्वितीय
तन्वी सावंत – तृतीय
विज्ञान प्रदर्शन:
प्रथम व तृतीय – गोगटे-जोगळेकर महाविद्यालय
सदर विजेते आता विभागीय स्तरावरील स्पर्धांसाठी सांगली येथे महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
या यशामागे प्रा. वेदांग सौंदलगेकर, प्रा. हरेश केळकर, प्रा. कश्मिरा सावंत, प्रा. बाबा सुतार, प्रा. शुभम पांचाळ, श्री. ओंकार बंडबे, श्री. गौरव बंडबे, गौरी साबळे आणि रोहित शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. आनंद आंबेकर यांनी संपूर्ण स्पर्धेविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूर देसाई, कला शाखा उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये, वाणिज्य शाखा उपप्राचार्य डॉ. सीमा कदम, विज्ञान शाखा उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. आनंद आंबेकर यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले.

