(तरवळ / अमित जाधव)
रत्नागिरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड यांच्या मार्फत बळीराम परकर विद्यालय मालगुंड येथील वय ९ ते १४ वयोगटातील मुलींना दिनांक १८ नोव्हेंबर रोजी HPV (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लस देण्यात आली.
मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या वतीने बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनियर कॉलेज मध्ये वय वर्षे ९ ते १४ या वयोगटातील मुलींच्या पालकांची सभा आयोजित करण्यात आली होती या सभेमध्ये मुलींना HPV (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लसीचे महत्त्व, गरज आणि सुरक्षितता याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. लसीकरणाद्वारे गर्भाशयाच्या कर्करोगापासून प्रभावी संरक्षण मिळू शकते, याबद्दल पालकांना माहिती देण्यात आली. व भविष्यात उद्भवणाऱ्या गर्भाशयाच्या कर्करोगावर प्रतिबंध घालण्यासाठी ही लस किती प्रभावी आहे हे पालकांना आरोग्य विभागातील अधिकारी डॉ परशुराम नेवेंडकर यांनी सांगितले व त्यांच्या मध्ये जन जागृती केली.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ये, तालुका आरोग्य अधिकारी डॉ महेश्वरी सातव, मालगुंड आरोग्य केंद्रातील वैद्यकीय डॉ अमोल पनकुटे व डॉ सुनीता पवार यांचे मार्गदर्शना खाली आरोग्य सहाय्यक डॉ परशुराम निवेंडकर यांनी सदर लसीकरणा बाबत मार्गदर्शन करून पालकांच्या शंकांचे निरसन केले. पालकांच्या संमतीनंतर विद्यालयातील पात्र मुलींचे HPV लसीकरण यशस्वीरित्या करण्यात आले.
लसीकरण मोहीम सुरळीत पार पाडण्यासाठी मालगुंड प्रशाला आणि ज्युनिअर कॉलेज चे मुख्याध्यापक बिपीन परकर तसेच प्रशालेतील शिक्षकवर्ग व आरोग्य विभाग यांनी उत्तम समन्वय साधला.
समाजात कर्करोग प्रतिबंधाबाबत जागरूकता निर्माण व्हावी आणि अधिकाधिक मुलींना संरक्षण मिळावे, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. या वेळी मुख्याध्यापक श्री बिपीन परकर सर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्वागत केले.

