छोट्या वादळांनी पर्वत हलत नसतो; शस्त्र परवान्यावरील वादावर मंत्री योगेश कदम यांचे विरोधकांना प्रत्युत्तर
(मुंबई) पुण्यातील गुंड घायवळ याला शस्त्र परवाना दिल्याप्रकरणामुळे मंत्री योगेश कदम सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या प्रकरणावरून विरोधकांनी त्यांच्यावर आरोपांचा भडिमार सुरू केला असताना, कदम यांनी सोशल मीडियावर पोस्ट…
मस्करी म्हणून वर्गमैत्रिणीला पाठवले अश्लील मेसेज; पोक्सोखाली दाखल खटला रद्द करण्यासाठी १५ वर्षीय मुलीची न्यायालयात धाव
(मुंबई) वर्गमैत्रिणीची मस्करी करण्यासाठी तिला अयोग्य आणि अश्लील संदेश पाठवल्यामुळे पोक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल केलेल्या मुंबईतील १५ वर्षीय मुलीने आपल्यावरील गुन्हा रद्द करण्यासाठी मे. उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.…
बनावट नोटा प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; एक कोटींच्या नकली नोटा जप्त, पाच जणांना अटक
(सांगली) स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील बनावट चलन तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी तब्बल एक कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पाच…
राजापूर तालुका बौद्धजन संघतर्फे संविधान दिनानिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा
(जैतापूर / राजन लाड) राजापूर तालुका बौद्धजन संघ, राजापूर गट क्र ३ यांच्या वतीने संविधान दिन निमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १६ नोव्हेंबर २०२५ रोजी…
फणसोप सडा येथे रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे साम्राज्य; स्थानिक प्रशासनाकडून डोळेझाक
(रत्नागिरी /प्रतिनिधी) शहराजवळील फणसोप सडा परिसरातील मुख्य रस्त्याच्या कडेला गेल्या काही महिन्यांपासून कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले असून, दुर्गंधी, माशा आणि अस्वच्छतेमुळे परिसर दुर्गंधीमय झाला आहे. प्रशासनाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत…
मशिदीत चोरी; सुमारे अडीच लाखांचा चांदीचा ऐवज लंपास
(मंडणगड / प्रतिनिधी) मंडणगड तालुक्यातील पिंपळोली येथील मशिदीत अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरीची घटना घडवून सुमारे दोन लाख सत्तेचाळीस हजार रुपयांचा चांदीचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकारामुळे गावात एकच खळबळ…
साफईस्ट कंपनीतील कामगारांना अचानकपणे कामावरून केले कमी; अन्यायाविरोधात १४पासून आमरण उपोषणाचा इशारा
(चिपळूण / प्रतिनिधी) गाणे-खडपोली एम.आय.डी.सी. परिसरातील साफईस्ट कंपनी प्रा. लि. येथील तब्बल २४० कामगारांना अचानकपणे कामावरून कमी करण्यात आल्याच्या निषेधार्थ कामगार वर्गात तीव्र संताप निर्माण झाला आहे. या सर्व कामगारांनी…
सांगवे केंद्रात पोषण आहार धान्याचा पुरवठा करणाऱ्या व्यक्तीचा मनमानीपणा; शाळा सुटल्यानंतर शिक्षकांना अडीच तास थांबवून ठेवले
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना पोषण आहाराच्या धान्याचा पुरवठा करणारा संगमेश्वर तालुक्यातील सांगवे केंद्राचा पुरवठादार मनमानीपणा करत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे असून सायंकाळी शाळा सुटल्यानंतर त्यांना पोषण…
दिव्यांगाप्रती संवेदनशीलता जागृती कार्यशाळा संपन्न; विविध शासकीय योजना व हक्कांची माहिती देण्यासाठी आयोजन
(रत्नागिरी) दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ च्या कलम ३९ नुसार दिव्यांगांप्रती संवेदनशीलता जागृती करण्यासाठी एकदिवसीय कार्यशाळा आज संपन्न झाली. जिल्हा परिषदेच्या कै. शामराव पेजे सांस्कृतिक भवन येथे ही कार्यशाळा आयोजित…
संगमेश्वरात चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री तीन दुकाने फोडली, हजारोंचा माल लंपास; श्वानपथकालाही अपयश
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर शहरात एकाच रात्री तीन दुकाने फोडून अज्ञात चोरट्याने हजारो रुपयांचा माल लंपास केल्याची घटना घडली आहे. संगमेश्वर एसटी बसस्थानकाजवळ, संगमेश्वर–देवरुख मार्गावरील साईराज कोल्ड्रिंक्स, दत्त कृपा…

