( राजापूर )
तालुक्यातील नाटे परिसरात बोटीवर खलाशी म्हणून कार्यरत असलेल्या प्रौढाचा संशयास्पद परिस्थितीत पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सुप्रीयन मिंज (वय ५६, रा. झारखंड) असे मृताचे नाव असून ही घटना शुक्रवारी उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मिंज हे २ डिसेंबर रोजी सहकाऱ्यांसोबत खाडीलगतच्या वहाळ परिसरात स्नानासाठी गेले होते. रात्री सर्वांसोबत जेवण करूनही ते झोपण्यासाठी निवाऱ्याकडे न जाता त्या ठिकाणीच बसून राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी ते आढळून न आल्याने सहकाऱ्यांनी शोध घेतला असता ते पाण्यात पडलेले दिसून आले. तत्काळ त्यांना राजापूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी नाटे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरु केला आहे.

