( पाली / वार्ताहर )
शिक्षण विभाग पंचायत समिती रत्नागिरी व सर्वंकष विद्यामंदिर कसोप यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी तालुका ५३ वे विज्ञान प्रदर्शन नुकतेच संपन्न झाले. पाली नं.१ शाळेची “भूकंपाचा अलार्म” ही आपत्ती व्यवस्थापन या विषयावर आधारित वैज्ञानिक प्रतिकृती विशेष लक्षवेधी ठरली.
रत्नागिरी तालुका विज्ञान प्रदर्शनामध्ये जि.प.पू.प्रा.आदर्श विद्यामंदिर पाली नं.१ च्या विद्यार्थ्यांनी भूकंप अलार्म प्रणाली ही आपत्ती व्यवस्थापन याअंतर्गत प्रतिकृती सादर केली होती. भुकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मोठी हानी होण्यापूर्वीच जर योग्य ती आपत्तीपूर्व माहिती मिळणे आवश्यक असते. हीच आपत्तीची पूर्वसूचना वेळेत लोकांपर्यंत पोहचवणे व त्यामुळे होणारी जीवीत व वित्तहानी टाळण्यास मदत करणे हा यामागचा उद्देश आहे.
ही प्रतिकृती पाली नं.१ शाळेचे विद्यार्थी यश महेश डोंगरे,
गौरव योगेश पांचाळ यांनी मार्गदर्शक विज्ञान शिक्षक श्रुती जयसिंग वारंग यांच्या मार्गदर्शनाखाली बझर, बेल, वायर, स्वीच, पिन इत्यादी नेहमीच्या वापरातील साहित्य वापरून तयार केली आहे. ती या प्रदर्शनात विशेष लक्षवेधी ठरली.

