शिवधामापूर येथे जमीन मोजणीच्या वादातून मारहाण; सात जणांविरोधात गुन्हा दाखल
(संगमेश्वर / प्रतिनिधी) तालुक्यातील शिवधामापूर, भेलेवाडी येथे जमीन मोजणीदरम्यान निर्माण झालेल्या वादातून एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी सात जणांविरोधात संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…
देवरुखात जम्मू-काश्मीरमधील हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली; सर्वधर्मीयांचा दहशतवादाला विरोध
(संगमेश्वर) देवरुख येथील जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करत देवरुख शहरात भव्य निषेध सभा आयोजित करण्यात आली. या वेळी विविध धर्मीय नागरिक, व्यापारी वर्ग, ग्रामस्थ…
प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेडचे त्रैवार्षिक अधिवेशन उत्साहात संपन्न
(खेड) महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेड ही खेड तालुक्यातील एक मोठी संघटना असून प्राथमिक शिक्षकांच्या समस्या व अडचणी सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेते. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम…
राजापूरमध्ये वृद्धेची आत्महत्या; घराच्या पडवीत घेतला गळफास
(राजापूर) तालुक्यातील परटवली, कुंभारवाडी येथे एका वृद्ध महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २४ एप्रिल रोजी सकाळी घडली. सुनिता नारायण पेंडखळकर (वय ६५) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या…
कशेडी घाटरस्त्यावर भेगा; नवीन रस्त्यावर दरडी कोसळण्याची शक्यता
( पोलादपूर / शैलेश पालकर) कशेडी घाटातील जुन्या मुंबई गोवा महामार्गावर भोगाव हद्दीत भेगा पडल्याने कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गात येत्या पावसाळ्यात दरडी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई गोवा…
बेदरकार दुचाकीस्वाराच्या धडकेत वयोवृद्धाचा मृत्यू; देवरुख पोलिसात गुन्हा दाखल
(संगमेश्वर) मार्लेश्वर-देवरुख रस्त्यावर मुरादपूर गावाजवळील अपघातात एक वयोवृद्ध पादचारी गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी देवरुख पोलिसांनी मुरलीधर श्रीधर खेडेकर (वय ३३, रा. मुरादपूर वरचीवाडी,…
राज्यात 5 हजारांहून अधिक पाकिस्तानी; कोणत्या जिल्ह्यात किती “पाकिस्तानी” जाणून घ्या
(मुंबई) जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) केंद्र सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. भारतात वास्तव्यास असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले…
संपत्तीच्या वादाने रक्तरंजित शोकांतिका! सख्ख्या बहिणीवर भावाने केला धारदार चाकूने हल्ला; रक्ताच्या थारोळ्यात बहिणीचा मृतदेह
(मुंबई) संपत्तीच्या वादात रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी थरकाप उडवणारी घटना मुंबईच्या जुहू परिसरात उघडकीस आली आहे. संपत्तीच्या वादाने पेटलेल्या एका भावाने आपल्या सख्ख्या बहिणीची धारदार चाकूने हल्ला करून निर्घृण हत्या…
रत्नागिरीत कै. लीला फडके स्मृती जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेला उत्साहात प्रारंभ
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ विकास कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या सातव्या जिल्हास्तरीय क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेची सुरुवात आज रत्नागिरी येथील मॅजिक स्क्वेअर चेस अकॅडमी येथे झाली. कै. लीला फडके यांच्या…

