उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्वीयसहायक महेश सामंत यांच्यावर चिरायू हॉस्पिटल मध्ये पॅरोटेड ग्रंथीच्या ट्यूमरची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी
(रत्नागिरी) रत्नागिरीतील सुप्रसिद्ध जनरल व लॅप्रोस्कोपीक सर्जन डॉक्टर अभिजीत पाटील यांनी चिरायु हॉस्पिटलमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्वीयसहाय्यक महेश सामंत यांच्यावर लाळ ग्रंथीवरील ट्यूमरची 38 टक्क्यांची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.…
तिहेरी खून प्रकरणातील मुख्य आरोपी दुर्वास पाटीलचा जामीन फेटाळला
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वत्र खळबळ उडवून देणाऱ्या वाटद-खंडाळा तिहेरी खून प्रकरणातील मुख्य आरोपी दुर्वास पाटील याचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. आरोपी दुर्वासने वडिलांच्या निधनानंतर उत्तरकार्यांसाठी जामीन मिळावा,…
विद्यार्थ्यांनी वृत्तपत्रातील अग्रलेख नियमित वाचले पाहिजेत – माधव अंकलगे
(रत्नागिरी / वैभव पवार) मराठी भाषा दोन हजार वर्षापेक्षाही जुनी आहे. ती स्वायत्त असून तिच्यातील ग्रंथ संपदा ही देखील मोलाची असल्यानेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मराठी भाषेत…
दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने किल्ले भवानगड, राजवाडी येथे श्रमदान मोहिम संपन्न
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी व चिखली गावांच्या सीमेवर असलेला टेहेळणी गड भवानगड येथे दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळी आठ वाजता गडावरील भवानी मातेच्या…
महाड ते शिवराजधानी रायगड समता मार्गावर संत-स्वराज्य-संविधानयात्रेचे आयोजन – उल्का महाजन यांची माहिती
(पोलादपूर /शैलेश पालकर) संविधान उखडायचे आहे असा प्रतिगाम्यांचा विचार स्पष्ट झाल्यानंतर आता संविधानासोबत जनतेला आणायचा प्रयत्न आहे. भीमरावांच्या चवदार तळे ते शिवरायांच्या रायगडपर्यतच्या समता मार्ग करीत आहोत. 2027 ला समतेचा…
किनाऱ्यावर “डुम्सडे फिश” आढळल्याने देशभरात चिंता!
तामिळनाडूच्या पंबनजवळील समुद्रात किनाऱ्यालगत एका मच्छिमाराच्या जाळ्यात दुर्मिळ आणि रहस्यमय मासा “Doomsday Fish” सापडला गेला आहे. जपानी पौराणिक कथांनुसार, या माशाचे किनाऱ्याजवळ पाण्याच्या पृष्ठभागावर दिसणे मोठ्या नैसर्गिक आपत्तींचे संकेत मानले…
रेल्वेच्या कन्फर्म तिकीटाची तारीख ऑनलाइन बदलता येणार; कोणतेही रद्द शुल्क नाही
(नवी दिल्ली) रेल्वे प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. भारतीय रेल्वेने एक नवा नियम लागू करण्याचा निर्णय घेतला असून, पुढील वर्षी जानेवारीपासून प्रवाशांना त्यांच्या कन्फर्म तिकीटाची प्रवास तारीख ऑनलाइन बदलण्याची सुविधा…
“ती दुसऱ्याची झाली…” आदित्यच्या चिठ्ठीने दुहेरी आत्महत्येला नवीन कलाटणी!
(पालघर) विरारमधील दोन तरुणांच्या आत्महत्येच्या घटनेला नवी कलाटणी मिळाली आहे. सोमवारी रात्री बोळींज येथील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या १८व्या मजल्यावरून उडी मारून दोन तरुणांनी आत्महत्या केली होती. मृतांमध्ये शाम…
चक्क खजुराच्या बिया काढून २१.७८ कोटींचे कोकेन भरले! मुंबई विमानतळावर तस्करी उघड
(मुंबई) देशातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तस्करीचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खजुराच्या बिया काढून खजुराच्या पॅकेटमधून तब्बल २ किलो १७८ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात…
एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा! पगाराचा प्रश्न निकाली; दिवाळीसाठी महामंडळाची मोठी घोषणा
(मुंबई) १३ ऑक्टोबरपासून आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारकडून दिलासादायक बातमी आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा सप्टेंबर महिन्याचा पगार वेळेत व्हावा म्हणून सरकारने तब्बल ₹४७१.०५ कोटींचा निधी मंजूर केला आहे.…

