रत्नागिरीत ढगाळ वातावरण; आंबा हंगामाला विलंबाची शक्यता, बागायतदारांची चिंता वाढली
(रत्नागिरी) रत्नागिरी आणि परिसरातील तालुक्यांमध्ये सलग ढगाळ वातावरण कायम राहत असल्याने हापूस आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे. हवामानातील अचानक बदलामुळे झाडांवरील मोहोर येण्याची प्रक्रिया मंदावण्याची तसेच मोहोराऐवजी पुन्हा पालवी येण्याची…
संस्कृत भारतीतर्फे आयोजित श्रीमद्भगवद्गीता पारायणाला अभूतपूर्व प्रतिसाद; भगवद्गीता समुपदेशक, अनेक मार्ग दाखवणारी- डॉ. सुचेता परांजपे
(रत्नागिरी) आधुनिक काळामध्ये जीपीएस ज्याप्रमाणे माणसाला एकाच ठिकाणी जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग दाखवतो, त्याप्रमाणेच श्रीमद्भगवद्गीता ही माणसाला अनेक मार्ग दाखवते, आपण योग्य तो मार्ग निवडावा. तसेच गीता सर्वांचे समुपदेशन करते, असे…
हातखंबा तिठ्यावर दुर्दैवी घटना: अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार; चालक फरार
(रत्नागिरी / प्रतिनिधी) मुंबई–गोवा महामार्गावरील हातखंबा तिठानजीकच्या धाब्याजवळ रविवारी (दि. ७) पहाटे झालेल्या अपघातात एका नेपाळी पादचार्याचा जागीच मृत्यू झाला. अंतराम मंगलरामद थारू (वय ५०, रा. कैलाली, नेपाळ) असे मृत…
केदारनाथ पूरात ‘मृत’ घोषित झालेला शिवम 10 वर्षांनी पुण्यात जिवंत सापडला
(पुणे) चित्रपटात नायक शेवटच्या क्षणी जिवंत होतो असा ट्विस्ट वास्तव जीवनात घडल्याचे आश्चर्यकारक उदाहरण पुण्यात समोर आले आहे. 2015 च्या केदारनाथ पुरामध्ये बेपत्ता झाल्यामुळे मृत घोषित केलेला शिवम, तब्बल 10…
सप्तशृंगी गडावरील घाटात भीषण अपघात: कार 1000 फूट दरीत कोसळली; पटेल कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
(नाशिक) सप्तशृंगी गडावरील गणपती घाटात रविवारी दुपारी भीषण अपघात झाला. चारचाकी कार अंदाजे 900 ते 1000 फूट खोल दरीत कोसळल्याने सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिला, तीन…
सुहास थोरात खून प्रकरणात धक्कादायक वळण! मेहुणीशी प्रेमसंबंधांमुळे हत्या, तीन आरोपी ताब्यात
(कोल्हापूर) इचलकरंजीतील सुहास थोरात या 19 वर्षीय तरुणाचं अपहरण करून कर्नाटक सीमेवर निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस येताच संपूर्ण शहर हादरलं. सुरुवातीला जुन्या वैमनस्यातून हत्या झाल्याचं पोलिस तपासातून समोर आलं…
पैसा फंड इंग्लिश स्कूल ची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न
(संगमेश्वर / दिनेश अंब्रे) पैसा फंड इंग्लिश स्कूलची शैक्षणिक सहल दिनांक 2 डिसेंबर ते 5 डिसेंबर अशा चार दिवसाच्या कालावधीमध्ये संगमेश्वर ते प्रतिबालाजी, पुणे शिर्डी, शनिशिंगणापूर, छत्रपती संभाजी नगर, येवला,…
शिक्षक समितीचे राज्य महासचिव राजन कोरगावकर यांचे शिक्षक समिती खेड तर्फे स्वागत
(खेड) महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती राज्य महासचिव राजन कोरगावकर यांनी नुकतीच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती खेड शाखेला सदिच्छा भेट देऊन सभासदांच्या विविध प्रश्नाविषयी चर्चा करून मार्गदर्शन केले. यावेळी…
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
(रत्नागिरी) कोकण मराठी साहित्य परिषद् शाखा रत्नागिरीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 या महापरिनिर्वक दिनाच्या निमिताने बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जगदीश ओहोळ लिखित 'जग बदलणारा बापमाणूस' या पुस्तकाचे…
राज्यस्तरीय सुवर्णपदक विजेत्या मानसी हांदेचा पाचल येथे सत्कार
(राजापूर / तुषार पाचलकर) पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, पाचल यांच्या वतीने सरस्वती विद्या मंदिर पाचल तालुका राजापूर या प्रशालेच्या वाडिया हॉलमध्ये राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त करणाऱ्या कुमारी…

