(मंडणगड)
जिल्हा परिषद केंद्र शाळा देव्हारे (ता. मंडणगड) येथील इयत्ता दुसरीतील विद्यार्थी कु. प्रित सचिन भोईर याने मंथन टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचा आणि तालुक्याचा नावलौकिक वाढवला आहे.
सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या या परीक्षेत प्रितने १५० पैकी १४० गुण मिळवत राज्यस्तरावर ६ वा क्रमांक तर विभागीय गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याच्या या यशाबद्दल Manthan Foundation तर्फे प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
विशेष म्हणजे, याआधीही सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात प्रितने उल्लेखनीय कामगिरी करत आपली गुणवत्ता सिद्ध केली होती. सातत्यपूर्ण मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्याने हे यश कायम राखले आहे.
प्रितला वर्गशिक्षिका श्रीमती पवार मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले असून शाळेतील सर्व शिक्षकांचेही त्याला सहकार्य मिळाले. कोणतीही खासगी शिकवणी न लावता, शाळेत शिकवलेला अभ्यास आणि घरी आई-वडिलांनी घेतलेल्या मेहनतीच्या जोरावर त्याने हे यश मिळवले आहे, हे विशेष उल्लेखनीय आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल प्रितवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

