कोळंबे हायस्कूल दरड दुर्घटना : ३५० विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सभापती शर्वरी वेल्ये ॲक्शन मोडमध्ये
(संगमेश्वर / एजाज पटेल ) संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे येथील कमळजाबाई हायस्कूलच्या पाठीमागील डोंगराचा काही भाग कोसळल्याने शाळेच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेनंतर पंचायत समितीच्या सभापती शर्वरी वेल्ये…
रत्नागिरी रेल्वे स्थानक दुर्घटनेची सखोल चौकशी करा; दोषी ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाईची मनसेची मागणी
(रत्नागिरी) रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील सजावटीच्या छताचा काही भाग पुन्हा कोसळल्याच्या घटनेची सखोल चौकशी करून दोषी ठेकेदार तसेच संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण…
बांबू संशोधन केंद्राला ॲड. बाबासाहेब नानल गुरुकुलच्या विद्यार्थ्यांची अभ्यासपूर्ण भेट; शेती, निसर्ग आणि जैवविविधतेचे घेतले ज्ञान
(राजापूर) राजापूर तालुक्यातील सौंदळ येथील बांबू संशोधन केंद्राला रत्नागिरी येथील रा. भा. शिर्के प्रशालेच्या ॲड. बाबासाहेब नानल गुरुकुलमधील इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण शैक्षणिक क्षेत्रभेट दिली. या भेटीतून विद्यार्थ्यांना…
खरीप पीक विम्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत; भात-नाचणी उत्पादक शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन
(रत्नागिरी) प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) अंतर्गत खरीप हंगाम २०२६ साठी जिल्ह्यात भात आणि नाचणी या अधिसूचित पिकांचा विमा उतरविण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, या योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलै…
शामराव पेजे महामंडळाची ₹१ लाखांपर्यंत बिनव्याजी थेट कर्ज योजना; पात्र नागरिकांना अर्जाचे आवाहन
(रत्नागिरी) शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत ₹१ लाखांपर्यंतची थेट कर्ज योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत महामंडळाचा १०० टक्के आर्थिक सहभाग असून लाभार्थ्यांना स्वतःकडून कोणताही स्वनिधी…
भाट्ये किनाऱ्यावरील स्वच्छतेसाठी गोगटे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण; कचरामुक्तीसाठी मांडल्या प्रभावी शिफारशी
(रत्नागिरी) गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी व्यवसायाभिमुख कौशल्य अभ्यासक्रमांतर्गत भाट्ये समुद्रकिनाऱ्यावरील स्वच्छतेबाबत प्रत्यक्ष सर्वेक्षण करून सविस्तर अहवाल सादर केला आहे. या अहवालात किनाऱ्यावरील कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक प्रदूषण आणि…
निवळी-जयगड महामार्गावर तरवळ येथे जीवघेणे खड्डे; मोठ्या अपघाताचा धोका, कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी
(तरवळ / अमित जाधव) रत्नागिरी तालुक्यातील निवळी-जयगड महामार्गावरील तरवळ येथे खेडेकर यांच्या घरासमोरील रस्त्यावर मोठे आणि धोकादायक खड्डे पडल्याने वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या खड्ड्यांमुळे कोणत्याही क्षणी मोठा…
सावित्री पुलावरील संकट टळले; दोन्ही बार्ज हटवण्यात यश, पण बंदीच्या काळात बार्जेस कुठून आल्या?
सावित्री पुलावरील धडकेने यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
पावसाचा जोर ओसरला; वादळी वाऱ्यांनी वाढवली चिंता, जगबुडी नदीची पाणीपातळी घटली
(रत्नागिरी / प्रतिनिधी) गेल्या काही दिवसांपासून संततधार कोसळणाऱ्या पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला काहीसा दिलासा दिला असला, तरी आता वादळी वाऱ्यांनी नागरिकांची चिंता वाढवली आहे. पावसाचा जोर लक्षणीयरीत्या कमी झाला असला, तरी…
मतदार यादी पुनरीक्षणात टेरव बु. राज्यात अव्वल; १००% काम पूर्ण करणारे पहिले गाव!
(रत्नागिरी) भारत निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार राज्यभर सुरू असलेल्या विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) मोहिमेत रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील मौजे…

