(मुंबई)
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंचाने एका नर्तिकेच्या प्रेमात अडकून अखेर गोळी झाडून आत्महत्या केली होती. या घटनेने बीड, सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. गोविंद जगन्नाथ बर्गे (वय ३४, रा. लुखसमला, ता. गेवराई) असे मृत उपसरपंचाचे नाव आहे. मंगळवारी (९ सप्टेंबर) त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात नर्तिका पूजा देविदास गायकवाड हिच्या घरासमोरच स्वतःवर गोळी झाडून घेतली होती.
गुन्हा दाखल
या प्रकरणी पूजावर वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी लक्ष्मण चव्हाण (गोविंदचे मेहुणे) यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पूजाने वारंवार पैशांची मागणी केली आणि नकार दिल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती. या सततच्या त्रासामुळे गोविंदने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी पूजा गायकवाडला ताब्यात घेतले आहे.
इन्स्टाग्रामवर पूर
या घटनेनंतर पूजा गायकवाड अचानक चर्चेत आली. नृत्याचे व्हिडिओ आणि रिल्स पोस्ट करणाऱ्या पूजाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फॉलोअर्सची संख्या झपाट्याने वाढली आहे. काही दिवसांपूर्वी ६००–७०० फॉलोअर्स असलेले खाते आता थेट १९ हजारांवर गेले आहे.

