( गणपतीपुळे / वैभव पवार )
रत्नागिरी तालुक्यातील वरवडे बौद्धवाडी येथील बौध्दजन पंचायत समिती शाखा क्रमांक 30 या शाखेच्या ग्रामीण व मुंबई या दोन्ही विभागाने गुरुवार दिनांक 17/10/2024 रोजी अश्विन पौर्णिमेच्या पवित्र दिनी येथील तक्षशिला महाबोधी बुद्ध विहारात आयोजित केलेला वर्षावास सांगता समारंभ मोठ्या उत्साहात बौद्ध धम्मगुरु भन्ते आयन शीलकीर्ती थेरो यांच्या विशेष धार्मिक प्रवचनाने पार पडला. या कार्यक्रमाला वाडीतील लहान थोर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर भंते आयान शिलकिर्ती (थेरो) यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशील दिले.त्यानंतर बौद्ध धम्मगुरु आदरणीय भंते आयान शीलकिर्ती (थेरो) यांचे स्वागत शाखेचे अध्यक्ष आयु कुलदीप अनंत जाधव आणि केले.त्यानंतर इतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यामध्ये आदरणीय बौद्धउपासक आयु सुवेश चव्हाण सर,बौद्ध उपासक आयु संदीप जाधव,बा.खे. बौध्दजन संघाचे सचिव आयु स्वप्नील जाधव,क्रीडा क्षेत्रामध्ये विशेष कामगिरी केलेल्या विद्यार्थी वर्गाचा सत्कार त्यामध्ये संचित जाधव, श्रावणी जाधव, प्रिया जाधव, या वर्षावास कार्यक्रमासाठी वरवडे शाखेच्या महिला मंडळाने विशेष मेहनत घेतली म्हणून त्यांच्या कार्यकारी मंडळाचा सत्कार, त्याचबरोबर या वर्षावाससाठी ग्रंथ वाचन तीन महिने केले. त्यामध्ये आयुनी प्राप्ती मोहिते, राखी जाधव, प्राजक्ता जाधव, वर्षा जाधव, दीक्षा जाधव आणि त्यांना विशेष सहकार्य करणारे आयु नंदादीप जाधव, पंकज जाधव या सर्वांचा विशेष सत्कार भंते यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर आदरणीय भंते आयान शीलकिर्ती थेरो यांनी आपल्या मधुर वाणीतून उपस्थितांना धम्म प्रबोधन करून संबोधित केले.
शाखेचे अध्यक्ष आयु कुलदीप जाधव यांनी आभार प्रदर्शन केले. यामध्ये मालगुंड येथील पत्रकार आयु वैभव पवार यांचे वर्षावास कार्यक्रमाच्या प्रसिद्धीबद्दल आभार व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव आयु.रणजित जाधव यांनी केले. त्यानंतर स्नेहभोजन करण्यात आले. व रात्री ११.०० वाजता नवतरुण मंडळ यांच्या माध्यमातून करमणुकीचा कार्यक्रम सादर करण्यात आला. तसेच विजयादशमी दिवशी झालेल्या कार्यक्रमाचा बक्षीस वितरण सोहळा नवतरुण युवा मंडळाच्या माध्यमातून करण्यात आला.या संपूर्ण कार्यक्रमासाठी महिला मंडळ पुरुष मंडळ कार्यकारी मंडळ नवतरुण मंडळ वरवडे यांनी विशेष मेहनत घेतली.