(देवरूख / सुरेश सप्रे)
आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पहिल्या २००२ बॅचचे माजी विद्यार्थी धनंजय मिश्रा आज क्रिस फ्लेक्सीपॅक्स मुंबई या कंपनीत असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट पदावर कार्यरत आहेत. यांनी 2002 मध्ये मेकॅनिकल मधून पदवी प्राप्त केल्यानंतर सिका इंडिया मध्ये चार वर्षे ऑपरेशन मॅनेजर तसेच मिशेलिन टायर मध्ये कोलम्बो, युएस सारख्या देशी विदेशी कंपन्यामध्ये उच्च पदावर काम केले होते. या प्रवासाविषयी मनोगत व्यक्त करताना मिश्रा बोलत होते.
राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील माजी विद्यार्थी धनंजय मिश्रा यांनी त्या दिवसांचे वर्णन करताना ११९७-९८ सालात आंबव सारख्या ग्रामीण भागात तात्कालिन राज्यमंत्री रवींद्र माने यांनी प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमातून राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली. त्यावेळी मी पहील्या बॅचला मॅकेनिकल इंजिनिअरींगला प्रवेश घेतला व २००२पास झालो. त्यावेळी उच्च विद्याविभुषीत प्राध्यापक, सुसज्ज प्रयोगशाळा, निसर्गरम्य वातावरण यामुळे पदवीच्या चार वर्षात येथे उत्तम शिक्षण प्राप्त झाले. येथे शिक्षण घेण्याचा कार्यानुभव विलक्षण होता, त्यामुळे योग्य व पक्की पायाभरणी झाली. त्यामुळेच आज माझेसह अनेक विद्यार्थी आम्ही इनोव्हटिव्ह आयडिया विकास व अंमलबजावणी याद्वारे आमच्या प्रोफेशनमध्ये प्रगती साधत आहोत. मात्र या सर्वांचे श्रेय या महाविद्यालयाचेच आहे असंही मिश्रा यांनी सांगितले
पॅकेजिंग क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांच्या सप्लाय चेन प्लॅनींग व प्रोजेक्टवर या अभियांत्रिकी महाविद्यालयातील अनेक माजी विद्यार्थी उच्च पदावर काम करीत आहेत. धनंजय मिश्रासह २००२पासून आजपर्यंत या महाविद्यालयातून कोकणासह देशपातळीवरील सहा हजार विद्यार्थी पास होवून विविध क्षेत्रात देशविदेशातील अग्रगण्य कंपन्यामधे उच्च पदस्थानांवर पोहचले आहेत. काही तर परदेशात स्थायिक झाले आहेत. अशा हुशार होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना फी सवलतीही संस्थेमार्फत दिल्या जातात. अशातील विषेशता कोकणातील नचिकेत देशपांडे, दिपक विंचू, सुमुख राजवाडे, संग्राम सिंग यांचेसह अनेक विद्यार्थी आज परदेशात उच्चपदावर कार्यरत आहेत.

