( संगमेश्वर / प्रतिनिधी )
सह्याद्रि शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज खेर्डी -चिंचघरी सती विद्यालयाचे कलाशिक्षक श्री तुकाराम शिवाजी पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ हा आज मुंबई येथे पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दिनांक ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून राज्यातील उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांना सदर पुरस्कार दिला जातो पण काही तांत्रिक कारणांमुळे सदर पुरस्कार आज दिनांक २२ सप्टेंबर रोजी टाटा थिएटर नॅशनल सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स एन.सी.पी.ए.मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री, पंकज भोयर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, ज. मो. अभ्यंकर, आमदार मनीषा कायंदे, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिनंद्र प्रताप सिंह, शिक्षण संचालक महेश पालकर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सदर कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षकांच्या कामाचे कौतुक करून पुरस्कार वितरणाच्या शुभेच्छा दिल्या. कलाशिक्षक टी एस पाटील यांच्या चौफेर कामाची दखल घेऊन राज्य शासनामार्फत त्यांच्या या शैक्षणिक कार्याचा उचित गौरव करण्यात आला. त्यांच्या या त्यांच्या या राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल सह्याद्रि शिक्षण संस्था सावर्डेचे कार्याध्यक्ष चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम, जेष्ठ संचालक शांताराम खानविलकर,सचिव महेश महाडिक, जेष्ठ चित्रकार -शिल्पकार प्रकाश राजेशिर्के, संस्थेचे सर्व पदाधिकारी विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय वरेकर उपमुख्याध्यापिका सुलोचना जगताप पर्यवेक्षिका सौ आसावरी राजेशिर्के, सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, शालेय समिती सदस्य, विद्यालयाचे सर्व समिती सदस्य, ग्रामस्थ- पालक व विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

