(संगमेश्वर / एजाज पटेल)
गौरी-गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर कोकणातून परतीच्या प्रवासाला निघालेल्या भक्तांमुळे मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गासह संगमेश्वर–देवरुख–साखरपा मार्गावर काल (मंगळवारी) प्रचंड वाहतूक कोंडी झाली. मुंबईकडे परतीचा ओघ वाढल्याने संगमेश्वर चौकापासून हातखांबा दिशेपर्यंत, हॉटेल स्वाद परिसर, धामणी फाटा आणि देवरुखमार्गे जाणाऱ्या लोवलेपर्यंत लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
या कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी संगमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण आणि महामार्ग पोलीस रियाज मुजावर यांनी संपूर्ण पथकाने परिश्रम घेतले. पोलिसांच्या चोख नियोजनामुळे वाहनचालकांना दीर्घकाळ कोंडीत न अडकता हळूहळू पुढे जाता आले. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कायम रस्त्यावर राहून केलेल्या प्रयत्नांबद्दल अनेक वाहनचालक व प्रवाशांनी पोलिसांचे आभार मानले.

