(संगमेश्वर)
दिनांक १९ एप्रिल रोजी दैनिक नवराष्ट्र सन्मान सोहळा २०२५ पार पडला. यामध्ये आदर्श समाजसेवक पुरस्कार श्री. गंगाराम झिमा टोपरे यांना देण्यात आला. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हस्ते हा सन्मान गंगाराम टोपरे यांना प्रदान करण्यात आला.
कोणत्याही प्रसिद्धीची इच्छा मनात न बाळगता केवळ वसा म्हणून समाजसेवेचे व्रत जोपासनारे टोपरे खरोखरच आदर्श व्यक्तिमत्व आहे. समाजातील गरीब, गरजू लोकांसाठी सदोदित प्रयत्नशील असलेले टोपरे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमुळे प्रकाशझोतात आले आहेत. तालुक्यातील सर्वच स्तरातून गंगाराम झिमा टोपरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.
सेवानिवृत्त असलेले टोपरे आता सर्वाधिक काळ समाजसेवेत घालवणार आहेत. टोपरे यांच्या कृतीतून आदर्श घेत आपणही या समाजाचे देणे लागतो, हा विचार अनेकांना पटला आहे. यातूनच समाजसेवेचा धडा गिरवत अनेक हात पुढे सरसावतील असा विश्वास यानिमित्ताने पुढे आला आहे.